भारतीय रेल्वे सर्वात छोटा आणि सर्वात लांबचा प्रवास घडवते, कुठून कुठे जाते ट्रेन , काय मिळते प्रवाशांना सुविधा
भारतीय रेल्वे सर्वात मोठ्या आणि सर्वात छोट्या मार्गावर प्रवाशांना सेवा पुरवित असते. देशातील कोणत्या मार्ग सर्वात छोटा आणि कोणता मोठा आहे ते पाहूया...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे म्हणजे एक चमत्कार आहे. रेल्वे समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या रेल्वेतून ( RAILWAY ) दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी ( PASSENGER ) प्रवास करत असतात. या भारतीय रेल्वेचा सर्वात लांब किती मोठा आहे. याची आपल्याला माहीती आहे का आणि सर्वात छोटा मार्ग किती छोटा आहे , त्याचे प्रवासी भाडे ( FARE ) किती आहे. त्यात किती स्थानके लागतात या सर्वाची माहिती मोठी रंजक आहे, ती जाणून घेऊयात
भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकावर आहे, सुमारे अडीच कोटी प्रवाशांची जीवन रेखा आहे. या रेल्वेतून दररोज 2.50 कोटी प्रवासी प्रवास करीत असतात. आज आपण रेल्वेचा सर्वात लांबचा आणि सर्वात छोटा मार्ग कोणता ते पाहणार आहोत. ही माहिती ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटल्यावाचून राहणार नाही. डीब्रुगढ ते कन्याकुमारी धावणारी विवेक एक्सप्रेस हा रेल्वेचा सर्वात मोठा मार्ग आहे. हा मार्ग तब्बल 4286 किमीचा आहे. तर सर्वात छोटा मार्ग केवळ तीन किमीचा आहे. नागपूर ते अजनी दरम्यान तीन किमीच्या अंतरासाठी लांबपल्ल्याची ट्रेन चालविली जाते. हा रेल्वेचा सर्वात छोटा मार्ग आहे. या दोन रेल्वे मार्गची आणखी माहीती पाहूयात …
देशाचा सर्वात छोटा रेल्वे मार्ग …
नागपूर आणि अजनी स्थानकादरम्यान केवळ तीन किलोमीटरचे अंतर आहे. हा मार्ग पार करण्यासाठी सुद्धा अनेक लोक ट्रेनचा वापर करतात. हा सर्वात छोटा रेल्वे मार्ग महाराष्ट्रात आहे.
किती आहे भाडे …
नागपूर आणि अजनी यामधील प्रवास केवळ नऊ मिनिटात संपतो. या प्रवासासाठी रेल्वे जनरल क्लाससाठी साठ रूपये तर स्लीपर क्लाससाठी 175 रूपये भाडे आहे.
देशातील सर्वात लांबचा रेल्वे प्रवास….
देशातील सर्वात लांबचा प्रवास असलेली विवेक एक्सप्रेस नावाने ओळखली जाते. या ट्रेनची घोषणा स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जन्मतिथी निमित्त करण्यात आली होती. या ट्रेनचा प्रवास आसामपासून सुरू होतो आणि तामिळनाडूतील भारताचे सर्वात खालचे टोक असलेल्या कन्याकुमारीपर्यंत या ट्रेनचा प्रवास असतो. आठवड्यातून दोनदा ही ट्रेन चालविण्यात येत असते.या ट्रेनने एकूण 4,300 किमीचे अंतर पार केले जाते. या ट्रेनचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 80 तासांहून अधिक वेळ लागतो. या प्रवासादरम्यान 57 स्थानके लागतात आणि एकूण राज्यातून या ट्रेनचा प्रवास होतो.