Indian Railways : ट्रेन लेट झाली… चिंता नका करु, असा मिळवा संपूर्ण रिफंड, पाहा काय आहे नियम

भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. या भारतीय रेल्वेने दररोज अडीच लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. काही वेळा ट्रेन लेट होत असतात, त्यावेळी तुम्हाला जर गाडी पकडायची नसेल तर रिफंड रेल्वे देत असते. काय आहेत तिकीटांचे पैसे परत घेण्याचे नियम पाहूयात...

Indian Railways : ट्रेन लेट झाली... चिंता नका करु, असा मिळवा संपूर्ण रिफंड, पाहा काय आहे नियम
TDR - INDIAN RAILWAY Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 6:25 PM

अनेकदा रेल्वेच्या प्रवासात अनेकदा ट्रेन काही कारणांनी लेट होतात. त्यामुळे प्रवाशांना या ट्रेनचा काही उपयोग नसतो. कारण त्यांच्या कामाचे नियोजन बिघडलेले असते. किंवा इतक्या उशीरा पोहचून काही फायदा नसतो. अशा वेळी आपले पैसे वाया जात असतात. परंतू रेल्वेचे अनेक नियम सर्वांना माहिती नसतात. रेल्वे अशा बाबतीत देखील रिफंड देत असते. रेल्वेच्या प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचा संपू्र्ण परतावा मिळविता येत असतो. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची काही आवश्यकता नसते. अनेक प्रवाशांसाठी ही योजना महत्वाची आहे.

सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवा व्हिडीओ अपलोड झाला आहे. यात रेल्वेगाडी लेट झाली तर रेल्वेच्या प्रवाशाकडे काय पर्याय असतात रिफंड मिळविण्याची याची माहिती दिलेली आहे. जर प्रवाशांची ट्रेन तीन तासांहून अधिक लेट झाली तर प्रवाशांना रिफंड मिळू शकतो. या व्हिडीओ सांगण्यात आले आहे की प्रवाशांची ट्रेन काही कारणांनी तीन तासांहून अधिक काळ लेट झाली. तर रेल्वे त्याचा संपूर्ण परतावा परत करते. यासाठी रेल्वे प्रवाशांना टीडीआर ( Ticket Deposit Receipt ) फाईल करावा लागेल. टीडीआर ऑनलाईन किंवा ऑफलाईन फाईल करता येतो. टीडीआर फाईल करण्यापूर्वी प्रवाशांना संपूर्ण माहिती असायला हवी. तुमची ट्रेन तीन तासांहून लेट झाली आहे का ? आणि तुम्हाला ट्रेनचा प्रवास करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या तिकीटांचे पैसे परत मिळण्यासाठी काही स्टेप पाळाव्या लागतील.

स्टेप – 1

आयआरसीटीसीच्या मोबाईल एप्लीकेशनमध्ये जाऊन फाईल टीडीआर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

स्टेप – 2

त्यानंतर लेट झालेली ट्रेन सिलेक्ट करावी लागेल

स्टेप – 3

टीडीआर का फाईल करीत आहे याचे कारण तुम्हाला लिहावे लागणार आहे.

स्टेप – 4

रेल्वे प्रशासन तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे का याची तपासणी करेल,त्यानंतरच तुम्हाला तुमच्या ट्रेनच्या तिकीटांची रक्कम रिफंड होईल. या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसीचे ऐप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन या स्टेपना फॉलो करावे लागणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.