Vande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्
'द म्यूझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया'ने आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन गाणं 'वंदे मातरम्' लाँच केले (Vande Mataram new Song).
नवी दिल्ली : ‘द म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन गाणं ‘वंदे मातरम्’ लाँच केले (Vande Mataram new Song). विशेष म्हणजे या गाण्यामध्ये देशातील एकूण 100 संगीत निर्मात्यांचा समावेश आहे. भारतातील अनेक क्षेत्रात स्वत:ला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ‘द म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने आपले योगदान देण्याचा छोटासा प्रयत्न केला (Vande Mataram new Song).
आज 15 ऑगस्ट 2020 भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. त्यासोबत स्वात:ला आत्मनिर्भर केल्याचाही उत्साह झाला पाहिजे. यासाठी म्युझिक व्हिडीओ वंदे मातरम् आपल्यासाठी विशेष आहे.
VIDEO : 100 संगीतकारांकडून भारतमातेला वंदन, आत्मनिर्भर ‘वंदे मातरम्’ गाणे लाँच #VandeMataram #IndependenceDayIndia2020 #song pic.twitter.com/kgocK8YXsD
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2020
देशात पहिल्यांदा असं झाले असेल की, या व्हिडीओमध्ये देशातील 100 सर्वात मोठे संगीत निर्मात्यांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर गाणं तयार करण्यास मदत केली आहे. या संगीत निर्मात्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे.
या व्हिडीओमध्ये देशातील क्लासिकलपासून ते आतापर्यंतच्या नव्याा म्युझिकचाही समावेश आहे. यामध्ये फॉक म्युझिकही आहे. वेगवेगळ्या गायकांनी वंदे मातरम् गाणं गायले आहे. गाण्याची मधुरता तुमच्या मनाला देशभक्तीसोबत एक नवीन ऊर्जा देते. अप्रतिम असा हा म्युझिक व्हिडीओ आहे.
या व्हिडीओमध्ये देशातील वेगवेगळे संगीतकार आहेत. त्यात आनंदजीभाई शाह, प्यारेलाल शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, लुइस बँक्स, रिकी केज, शंकर लॉय, सलीम सुलेमान, विशाल शेखर, साजिद खान, श्रवण राठोड, कैलाश खेर, शान, अदनान सामी, हरिहरण, लेसली लुइस, राम संपत, शांतनू मोइत्रा, विद्यासागर, विशाल भारद्वाज, स्नेहा खानवलकर, आनंद मिलिंद, अजय अतुल, गुरु किरण, एम जयचंद्रन, अनूप जलोटा, सचिन जिगर, दलेर मेहंदी, रंजीद बरोट, रजत डोलकिया, भवदीप जयपुरवाले, वीजू शाह, इस्माइल दरबार यासह इतरही म्युझिक कंपोजर्सचा यामध्ये समावेश आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण