चीन आणि पाकिस्तानच्या हृदयात भरणार धडकी, भारताच्या सर्वात खतरनाक मिसाईलची चाचणी

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची भारताला गरज होती. रशिया आणि चीन या देशांनी हायपरसॉनिक क्षेपणास्रे तयार करण्यात आघाडी घेतली आहे. या शर्यतीत रशिया अमेरिकेच्याही पुढे गेला आहे.

चीन आणि पाकिस्तानच्या हृदयात भरणार धडकी, भारताच्या सर्वात खतरनाक मिसाईलची चाचणी
(Hypersonic Technology Demonstrator Vehicle - HSTDVImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 10:58 PM

भारतीय संरक्षण खात्याचे डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ( DRDO ) देशातील सर्वात खतरनाक मिसाईल बनविले आहे. अमेरिका, रशिया, चीन या देशांकडे असलेल्या क्षेपणास्रांसारखे हे क्षेपणास्र आहे. हे क्षेपणास्र प्रति तास 6126 ते 12,251 किमी वेगाने हल्ला करते. या क्षेपणास्राच्या प्रोटोटाईपची चाचणी 2020 आणि 2023 साली झाली होती. भारताच्या या क्षेपणास्राचा वेग इतका प्रचंड असतो की त्याला रोकणे कठीण असते. हे क्षेपणास्र हायपरसोनिक क्रुज क्षेपणास्र आहे.

डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ( DRDO ) देशातील सैन्य दलासाठी संशोधन आणि शस्रास्र बनवित असते. या संस्थेने या पूर्वी अग्नि आणि पृथ्वी सारख्या क्षेपणास्रांचा विकास केला आहे. या क्षेपणास्राच्याने हिंदुस्थानच्या सैन्याची ताकद वाढणार आहे, ज्या पहिल्या चाचण्या केल्या गेल्या त्याचे नाव हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल ( Hypersonic Technology Demonstrator Vehicle – HSTDV ) होते. भारत गेल्या काही वर्षांपासून हायपरसॉनिक क्षेपणास्रांवर काम करीत आहे. यापूर्वी HSTDV क्षेपणास्राची चाचणी करण्यात आली तेव्हा ती 20 सेकंदांपेक्षा कमी होती.

काही सेंकदात चीन-पाकिस्तानातील टार्गेट नष्ट

या आधी या क्षेपणास्रांच्या चाचण्या 7500 किमी प्रति तासांच्या वेगाने होत होत्या. भविष्यात याचा वेग वाढविण्यात येणार आहे. तसेच या क्षेपणास्रांद्वारे अण्वस्रं देखील वाहुन नेता येणार आहे. त्यामुळे काही सेंकदात टार्गेट नष्ट होणार आहे. शेजारील शत्रूराष्ट्रातील पाकिस्तान आणि चीनसह अनेक महत्वाच्या टार्गेटना तसेच सैन्य अड्ड्यांना क्षणात नष्ट करता येणार आहे.

या क्षेपणास्त्राची गरज का होती?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची भारताला खूपच गरज आहे. अमेरिका गेल्याकाही वर्षांपासून सातत्याने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या शर्यतीत रशिया त्यांच्याही पुढे गेला आहे. रशियाकडे अनेक हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. चीनकडेही अशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत

हायपरसॉनिक क्षेपणास्र काय आहेत?

हायपरसॉनिक शस्त्रास्रे ध्वनीच्या पाचपट वेगाने प्रवास करतात. म्हणजे 6100 किमी/ प्रति तास किंवा त्याहून अधिकही त्यांचा वेग असतो. त्यामुळे शत्रूंना त्यांचा माग काढणे आणि पाडणे सोपे नसते. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर झाला आहे. रशियाने ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली आहेत.

भविष्यात अधिक धोकादायक

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे भविष्यात अधिक धोकादायक होतील. अनेक महाशक्तींनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा साठा केला आहे. अमेरिका तर असे क्षेपणास्त्रे तयार करीत आहे जे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासारखे प्रक्षेपित होईल परंतु लक्ष्य नष्ट करण्यापूर्वी त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा आठ पट जास्त असेल.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.