पुढच्या महिन्यापासून धावणार भारताची पहीली हायड्रोजन ट्रेन, कोणता मार्ग आणि वेग किती पाहा

काही काळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन कारचे प्रात्यक्षिक दाखविले होते. ते संसदेत हायड्रोजन कारमध्ये बसून आले होते. आता भारतीय रेल्वे पुढील महिन्यापासून भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन चालविणार आहे.

पुढच्या महिन्यापासून धावणार भारताची पहीली हायड्रोजन ट्रेन, कोणता मार्ग आणि वेग किती पाहा
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 5:48 PM

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असताना आता भारतात हायड्रोजनवर ( Hydrogen Train) चालणारी ट्रेन सेवेत येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यांपासून हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल होणार आहे.ही ट्रेन डिझेल किंवा वीजेवर धावणार नसून ती चक्क हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करणार आहे.भारताने साल 2030 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.चला तर पाहूयात या ट्रेनचा मार्ग, वेग आणि इतर फिचर्स काय आहेत. ही ट्रेन हायड्रोजनवर चालणार म्हणजे नेमकी कशावर चालणार हे पाहूयात…

कशी काम करणार हायड्रोजन ट्रेन ?

हायड्रोजन इंधन वापरणारी ही पहिली ट्रेन असणार आहे.ही ट्रेन ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे.डिझेल किंवा वीजेच्या ऐवजी ही ट्रेन हायड्रोजन वायूवर वीज तयार करेल आणि त्यावर धावणार आहे.या मागचे विज्ञान समजण्यासाठी तुम्हाला शाळेतील केमिस्ट्री विषयाला उजळणी द्यावी लागेल. तुम्ही केमिस्ट्रीचे जरी हुशार विद्यार्थी नसला तरी तुम्हाला पाण्याचा फॉर्म्युला नक्कीच माहिती असेल. पाणी म्हणजे रासायनिक भाषेत H20 होय. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असे मिळून पाणी तयार होते. याच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून वीज तयार केली जाणार आहे.यातून एकमेव बाय प्रोडक्ट म्हणून पाणी आणि वाफ तयार केली जाईल.

कार्बन उत्सर्जन कमी करणार

भारतीय रेल्वे हायड्रोजन ट्रेनच्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करणार आहे. आणि डिझेल इंजिनाने होणारे हवेचे प्रदुषण कमी करणे हा हेतू आहे. हायड्रोजनचा वापर करुन ही ट्रेन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे प्रदुषण निर्माण करणारे घटक तयार करीत नाही. त्यामुळे ही ट्रेन कोणतेही हानिकारक उत्सर्जन करणार नाही. यातून कोणतेही प्रदुषण होणार नाही.

हे सुद्धा वाचा

 हायड्रोजन का ?

या ट्रेनमुळे डिझेल इंजिनाच्या तुलनेत 60 टक्के कमी ध्वनी प्रदुषण होईल. भारतीय रेल्वे 35 हायड्रोजन ट्रेनना देशभर तैनात करण्याची योजना आखत आहे.फायनान्सियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार हायड्रोजन ट्रेनची पहिली ट्रायल रन हरियाणाच्या जिंद-सोनीपत मार्गावर होणार आहे. या 90 किलोमीटरच्या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी होणार आहे. त्यानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माऊंटन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे सारख्या हेरिटेज माऊंटेन रेल रूट या ट्रेनच्या चाचणी होऊ शकतात.

वेग किती आणि खर्च किती असणार ?

या ट्रेनचा कमाल वेग दर ताशी 140 किमी इतका असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.एकदा फ्युअल भरल्यानंतर ही ट्रेन 1,000 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. या ट्रेनला एका तासाला सुमारे 40,000 लिटर पाण्याची गरज लागणार आहे,ज्यासाठी खास वॉटर स्टोरेज फॅसिलिटी मिळणार आहे.प्रत्येक मार्गावर हायड्रोजन ट्रेनला सुमारे 80 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.