मुंबई ते अहमदाबादचा बुलेट ट्रेनच्या समुद्री बोगद्यासाठी देशातील सर्वात मोठी टीबीएम मुंबईत बांधणार, अबब.. व्यास तब्बल 14.5 मीटर
मुंबई ते अहमदाबाद बुलेट प्रकल्पामुळे दोन शहरातील सुमारे पाचशे किमीचे अंतर दर ताशी 320 किमी वेगाने अवघ्या अडीच तासांत पार करता येणार आहे.
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा ( Mumbai to Ahemadabad Bullet Train ) प्रकल्पाचा कामकाज वेगाने होत आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून बुलेट ट्रेनचे बांधकाम गुजरात राज्यात वेगाने सुरु आहे. या प्रकल्पामुळे दोन शहरातील अंतर अडीच तासांत पार होणार आहे. या बुलेट ट्रेनचे बांधकाम जपानच्या मदतीने होत आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( NHSRCL ) ने बुलेट ट्रेनच्या पहिल्या पहिल्या 7 किमी लांबीच्या समुद्र खाडीसह 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या ( C-2 package ) बांधकामासाठी मेसर्स एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ( M/s Afcons Infrastructure Limited ) कंपनीशी करार झाला आहे. या सागरी बोगद्यासाठी देशातील सर्वात मोठी टनेल बोअरींग ( TBM ) मशिन मागविण्यात येणार आहे. या टीबीएम मशिनचा व्यास 14.5 मीटर असून ती देशातील आतापर्यंत सर्वात मोठी मशिन असल्याने हा बोगदा सर्वात जास्त त्रिज्या असलेला ठरणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद 508 किमीच्या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद या दोन महानगरातील अंतर अडीच तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम गुजरात राज्यात वेगाने सुरु आहे. महाराष्ट्रातील सुरूवातीच्या भुयारी स्थानकासाठी बीकेसी ते शिळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या 21 किमी बोगद्याच्या मार्गासाठी गेल्याच आठवड्यात करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रखडलेले भूमिअधिग्रहन सत्तांतरानंतर आता वेगाने होत असून कंत्राटांचे वाटप विविध टप्प्यांवर आहे. गुजरात राज्यातील बुलेट ट्रेनचा मार्गाचे काम वेगाने होत असून सुरत ते बिलीमोरा हा टप्पा साल 2026 पर्यंत सुरु करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे गुजरात राज्यातील बांधकामाचा वेग वाढला आहे. आता गुजरातमधील बुलेट ट्रेनच्या मार्गाचे व्हायडंक्ट आणि स्टेशन वगळून उर्वरीत पिलर उभारणीचे 200 किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई बीकेसी एचएसआर स्टेशन आणि शिळफाटा दरम्यान दुहेरी मार्गासाठी बोगद्याच्या बांधकामासाठी ( सुमारे 21 कि.मी. ) [ MAHSR PACKAGE C-2] – करारावर हस्ताक्षर करण्यात आले आहे.
ठाणे, विरार आणि बोयसर स्थानकांची निविदा
मुंब्रा येथील शिळफाटा आणि गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील जरोळी गावादरम्यान 135 कि.मी.च्या मार्गाच्या सिव्हील आणि बिल्डींग निर्मितीसह ठाणे, विरार आणि बोयसर [ MAHSR PACKAGE C-3] – तांत्रिक निविदा 12 एप्रिल 2023 रोजी उघडण्यात आल्या आहेत.
मेनलाईनवर एकूण 342 किमीचे व्हायाडक्टचे काम ( स्टेशन आणि पूल वगळून ) पूर्ण झाले आहे. गेल्या सात महिन्यात 100 कि.मी.चे पियरचे ( खांब ) काम झाले आहे.
पाईलचे ( पाया ) काम – 298 कि.मी.
पियरचे ( खांब ) काम – 200 कि.मी.
व्हायडक्ट गर्डरचे काम – 64 कि.मी.