भारतातील सर्वाधिक शिकलेले 10 नेते तुम्हाला माहितीयेत का? पदव्या ऐकूण उर अभिमाने भरून येईल!
भारतात अनेक नेते असून, त्यांच्यातील काहींनी उच्चशिक्षण घेतले आहे. या लेखात भारतातील 10 सर्वाधिक शिक्षित नेत्यांची माहिती देण्यात आली आहे.
भारतात असंख्य नेते आहेत. असंख्य पक्ष आहेत. कारण आपला देश हा लोकशाही प्रधान आहे. त्यामुळे कुणालाही पक्ष काढता येतो. त्याचं स्वतंत्र राजकारण करता येतं. त्यामुळेच भारतात नेत्यांची काही कमी नाही. पण आपल्याकडे जसे कमी शिकलेले नेते आहेत, तसेच सर्वाधिक शिक्षण घेतलेले नेतेही आहेत. त्यांच्या पदव्या पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं तुम्हालाही वाटेल. आम्ही निवडक दहा नेत्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत. हे नेते कोणत्याही पक्षातील असोत, पण आपल्या देशातील नेते प्रचंड शिकलेले असल्याचं वाचून तुमचाही ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. मनमोहन सिंग
या यादीत डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव सर्वात वर आहे. मनमोहन सिंग यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून इकोनॉमिक्स ऑनर्सची डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर यूकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात डी. फिल केली. ते भारताचे माजी पंतप्रधाना आहेत. त्यांच्याकडे एम ए (अर्थशास्त्र), अर्थशास्त्र ट्रिपोस (प्रथम श्रेणी ऑनर्स) आणि डी.फिल. सारख्या पदव्या आहेत. ते आरबीआयचे गव्हर्नरही होते आणि केंद्रीय अर्थमंत्रीही होते.
डॉ सुब्रमण्यम स्वामी
सुब्रमण्यम स्वामी नेहमीच वादात असतात. त्यांनी दिल्लीच्या हिंदू कॉलेजातून मास्टरची डिग्री घेतली होती. तसेच कोलकाताच्या भारतीय सांख्यिकी संस्थेतून सांख्यिकीमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली. त्यांनी गणितात बीए (ऑनर्स) आणि एम. ए. (सांख्यिकी) आणि पीएच.डी. (अर्थशास्त्र) केली आहे.
डॉ. हर्षवर्धन
डॉ. हर्षवर्धन यांनी कानपूरच्या मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. ते ईएनटीचे तज्ज्ञ आहेत. तसेच एमबीबीएस आणि एमएसही त्यांनी केलं आहे.
सुरेश प्रभु
सुरेश प्रभू हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. तसेच ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI)चे सदस्यही आहेत. त्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. त्यांनी सार्वजनिक वित्त आणि क्लायमेट चेंज या विषयात डॉक्टरेट केली आहे. त्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत. त्यात बी.कॉम. (ऑनर्स), एल.एल.बी. आणि एफ.सी.ए. चा समावेश आहे.
शशि थरूर
थरूर यांनी 1975मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफंस कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर मास्टर डिग्रीही घेतली. बोस्टनमध्ये टफ्ट्स विद्यापीठातून फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमेसीमधून अंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पीएचडी केली. त्यांच्याकडेही अनेक पदव्या आहेत. त्यात बी.ए. (ऑनर्स), एम.ए., एम.ए.एल.डी., पी.एच.डी. आणि डी.लिट (मानद)चा समावेश आहे.
जयराम रमेश
जयराम रमेश यांनी आयआयटी बॉम्बे येथून अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी आणि मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून उच्चशिक्षण पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी.टेक. आणि एम.एस. या पदव्या आहेत.
असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी वकील असून त्यांनी लंडन येथील लिंकन इनमधून शिक्षण घेतले आहे. बी.ए., एल.एल.बी. (लंडन) आणि बार-अॅट-लॉ या पदव्या त्यांच्याकडे आहेत.
जयंत सिन्हा
जयंत सिन्हा यांनी आयआयटी दिल्लीमधून अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी पेंसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतून एमएससी (ऊर्जा व्यवस्थापन आणि धोरण) आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल कडून एमबीए पूर्ण केलंय. त्यांच्याकडे बी.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग), एमएससी (ऊर्जा व्यवस्थापन आणि धोरण), आणि एमबीए या पदव्या आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूलमधून त्यांनी एमबीए केलं. त्यांच्याकडे बी.ए. आणि एमबीए या पदव्या आहेत.