तेल उत्खनन तंत्रज्ञानात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींकडून स्वदेशी ऑईल रीगचे कौतुक

भारतासारख्या विकसनशील देशात उर्जा साधनाचे महत्व अन्यनसाधारण आहे. आपल्या गरजेच्या ८० टक्क्याहून जास्त खनिज तेलाची आयात करणाऱ्या भारताचे बरेचसे परदेशी चलन यासाठी खर्च होते. भारताच्या स्वताच्या तेल क्षेत्रातले तेल उत्पादन वाढवण्यासाठी ओएनजीसी आणि इतर कंपन्या प्रयत्न करत आहेत.

तेल उत्खनन तंत्रज्ञानात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींकडून स्वदेशी ऑईल रीगचे कौतुक
Petroleum minister Hardeep Singh PuriImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 5:52 PM

बेतूल | 8 फेब्रुवारी 2024 : भारतासारख्या विकसनीशील देशात उर्जा साधनाचे महत्व अन्यनसाधारण आहे. आपल्या गरजेच्या ८० टक्क्याहून जास्त खनिज तेलाची आयात करणाऱ्या भारताचे बरेचसे परदेशी चलन यासाठी खर्च होते. भारताच्या स्वत:च्या तेल क्षेत्रातले तेल उत्पादन वाढवण्यासाठी ओएनजीसी आणि इतर कंपन्या प्रयत्न करत आहेत. तेल उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वदेशी ऑटोमेटेड हायड्रोलिक वर्कओव्हर रिगच्या उत्पादनात आता भारताने आघाडी घेतली आहे.

गोव्यात चालू असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2024 ला भेट दिल्यानंतर त्या ठीकाणी प्रदर्शनात मांडलेल्या स्वदेशी रीग्जचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कौतुक केले. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) आणि त्यांची उपकंपनी ड्रीलमेकने याची निर्मीती केली आहे. अशा संयत्राचा पुरवठा करण्याचे कंत्राट ओएनजीसीने MEIL ला दिलेले आहे. प्रदर्शनात HH 150 हायड्रोलिक वर्कओव्हर रिगचे कौतुक करताना मंत्री हरदीप सिंग यांनी X ( पूर्वी Twitter म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ) समाजमाध्यामावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

एमईआयएलने उच्च सुरक्षा मानकांचा अर्तंभाव केलेली 55% मेक इन इंडिया सामग्री वापरून विकसित केलेली ( ड्रिलमेक एसपीए इटलीचे तंत्रज्ञान) नव्या पिढीची स्वयंचलित रिग पाहून आनंद झाला. यापैकी 20 स्वयंचलित रिग भारताच्या ऊर्जा प्रवासाला सामर्थ्य देण्यासाठी @ONGC_ ला वितरीत केल्या जात आहेत, असं हरदीप सिंग यांनी सांगितलं.

ऊर्जा साहित्याचे स्वदेशी उत्पादन

या प्रसंगी MEIL चे व्यवस्थापकीय संचालक पी.व्ही. कृष्णा रेड्डी हे देखील होते. त्यांनी देखील देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी देशांतर्गत तेल आणि वायूच्या उत्खननाला गती देण्यासाठी जागतिक दर्जाच्या उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी MEIL वचनबद्ध असल्याचे सांगितले. आत्मनिर्भर भारताच्या धोरणा अर्तंगत ऊर्जा साहित्याचे स्वदेशी उत्पादन घेण्याचे मोठ उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरीक्त MEIL ने इलेक्ट्रिक मोबिलिटी, वाहतूक, स्वच्छ इंधन आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधेसाठी काम करणाऱ्या उपकंपन्या ऑलेक्ट्रा , एव्हे ट्रान्स, मेघा गॅस आणि ICOMM यांची उत्पादने सुद्धा या प्रर्दशनात मांडली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.