Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धात भारताचा दुसरा बळी गेलाय. कारण आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कालच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता.

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू
आजारपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यूImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:14 PM

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारताचा दुसरा (Indian Students In Ukraine) बळी गेलाय. कारण आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death In Ukraine) झाल्याची माहिती समोर आली आहे. तो आजारी होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कालच गोळीबारात (Firing) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता. त्यात आज पुन्हा एक विद्यार्थी गमावल्याने चिंतेचे वातावरण पसले आहे. रशिया युक्रेन युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काल मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांवर रशियन सैन्याचा गोळीबार झाला होता. आज मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. भारतीय विद्यार्थी जमेल त्या परीने सध्या युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत.

रशियाचे सतत हल्ले सुरू

त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. या युद्धाची मोठी झळ भारतालाही बसत असल्याचे दिसून येत आहे.  यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे.

परतीचे युद्धपातळीवर प्रयत्न

अनेक भारतीयांची मुलं नातेवाईक युक्रेनमध्ये अडकल्याने सध्या भारतातही चिंतेचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांना परत भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारनेही हलाचाली वाढवल्या आहेत. मात्र युद्धामुळे काही मोठे अडथळे येत आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यात आपल्यालं यश आले आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यांना लवकरात लवकर परत आणा अशी मागणी यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. भारतीय विद्यार्थी अडकल्याने सारा देश सध्या हळहळ व्यक्त करत आहेत. काल एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर मोदींनी दिल्लीत तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढाव घेतला आहे. युद्धपातळीवर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

Russia Ukraine War politics: झेलेन्सिकीला घालवून पुतीनना यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण हवंय? एका नावाची जोरदार चर्चा

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia Ukrane War : युक्रेनच्या “भुतानं” रशियाला झपाटलं, रशियाच्या 6 फाइटर जेटचा केला भुगा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.