Indigo Airlines : दिव्यांगाला विमानात चढताना रोखणाऱ्या IndiGo एयरलायन्सला दणका, ठोठावला 5 लखांचा दंड
इंडिगोने 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले. यावर कडक कारवाई करत DGCA ने कंपनीला हा 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नवी दिल्ली : इंडिगो एरलायन्सला (Indigo Airlines) मोठा दणका बसला आहे. कारण दिव्यांग व्यक्तीला (Handicap) विमानात बसण्यास नकार दिल्याबद्दल एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने इंडिगो एअरलाइन्सवर मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोने 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले. यावर कडक कारवाई करत DGCA ने कंपनीला हा 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएनेही या घटनेबाबत कंपनीला फटकारले आहे. कंपनीचे ग्राउंड स्टाफ एका अपंग मुलाला नीट हाताळू शकले नाहीत, उलट त्यांनी परिस्थिती आणखी बिघडवली. या प्रकरणात त्यांनी अधिक संवेदनशीलपणे वागाणे अपेक्षित होते, ज्यामुळे मुलासाठी प्रक्रिया सुलभ झाली असती. मात्र कंपनीचे कर्मचारी हे करू शकले नाहीत, उलट टोकाचे पाऊल उचलत शेवटी प्रवाशाला विमानात बसण्यास नकार दिला. असे म्हणत कंपनीचे वाभाडे कारढण्यात आहेत.
जोतिरादित्य सिंदियांनी दिलेलं कारवाईचं आश्वासन
या ग्राहकाने ऑनलाईन तक्रार केली होती. आणि त्यांनी थेट हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य संदिया यांना कारवाईसाठी साद घातली होती. त्यानंतर “असे वर्तन कधीही सहन केले जाणार नाही. कोणत्याही माणसाला यातून जावे लागू नये! या प्रकरणाची स्वत: चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे आश्वासन सिंदिया यांनी दिले होते.
तक्रार आणि सिंदिया यांचं ट्विट
There is zero tolerance towards such behaviour. No human being should have to go through this! Investigating the matter by myself, post which appropriate action will be taken. https://t.co/GJkeQcQ9iW
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) May 9, 2022
विमान कंपीनीच्या दादागिरीची ही पहिलीच वेळ नाही
एखाद्या विमान कंपनीने दादागिरी करणे किंवा असंवेदनशील वागण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आता डीजीसीए अशा कंपनीन्यांविरोधात कठोर पाऊलं उचलत आहे. त्यातूनही कारवाई या एअरलायन्सवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीला चांगलाच दणका बसला आहे. यानंतर कंपनीवर चारी बाजुने टीका होत आहे.
ग्राहकांना चांगली सेवा देण्यात फेल ठरले
या घटनेबाबत बोलताना डीजीसीएचे अधिकारी म्हणाले, विशेष परिस्थितीत असामान्य पावले उचलावी लागतात, परंतु कंपनीचे कर्मचारी नागरी विमान वाहतुकीवेली प्रवाशांच्या भावना आणि वचनबद्धतेनुसार काम करु शकले नाहीत, हे कंपनीचं मोठं अपश आहे. हे पाहता डीजीसीएने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विमान नियमांच्या तरतुदीनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.
आम्ही लावू तो नियम चालत नाही
अनेकदा अनेक कंपन्या या आम्ही लावू तो नियम अशी भूमिका घेताना दिसतात. मात्र याला कारणीभूत ग्राहकांचे अज्ञानही आहे. ग्राहकांना आपले हक्क व्यवस्थित माहीत असल्यावर कंपनीची ही मजल होणार नाही. हेच या ग्राहकानेही दाखवून दिले आहे. त्याला चांगली वागणूक न देण्याऱ्या कंपनीवर कारवाई होईपर्यंत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आता कंपनीला या प्रकरणानंतर चांगलीच चपराक बसली आहे. हेच आता दुसऱ्या कुणाबरोबर पुन्हा घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.