Indigo चे प्रवाशी विमानतळावरच ताटकळले, बुकिंग सिस्टिम फेल, एअरपोर्टवर लांबच लांब रांगा

Indigo Booking System Fails : इंडिगोची सेवा कोलमडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. कंपनीची बुकिंग सिस्टिम फेल झाल्याने अनेक विमानतळावरील प्रवाशी ताटकळले आहेत. विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. थोड्यावेळापूर्वी कर्मचाऱ्यांनी पण जादा कामाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती.

Indigo चे प्रवाशी विमानतळावरच ताटकळले, बुकिंग सिस्टिम फेल, एअरपोर्टवर लांबच लांब रांगा
इंडिगोची सेवा कोलमडली
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 3:14 PM

इंडिगोची सेवा कोलमडली आहे. अनेक विमानतळावर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. इंडिगोची बुकिंग सिस्टिम फेल झाली आहे. तिकीट बुकिंगची गती मंदावली असल्याने विमान उड्डाणावर परिणाम झाला आहे. कंपनी ही समस्या त्वरीत सोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. पण तोपर्यंत विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. थोड्यावेळापूर्वी कर्मचाऱ्यांनी पण जादा कामाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. त्यातील काहींनी विमान उड्डाणाला नकार दिला होता. त्यानंतर आता ही समस्या समोर आली आहे.

गेल्या दोन तासांपासून तांत्रिक बिघाड

हे सुद्धा वाचा

कंपनीने स्वतः या अडचणीची माहिती ट्विट करुन समाज माध्यमावर दिली आहे. त्यानुसार, जवळपास 12.30 वाजता कंपनीच्या बुकिंग प्रणालीत तांत्रिक अडचण आली. तेव्हापासून ही समस्या सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील फ्लाईट ऑपरेशन्स आणि ग्राउंड सर्व्हिसेजवर मोठा परिणाम दिसून येत आहे. इंडिगोने थोड्या वेळापूर्वी या समस्यने त्यांच्या प्रणालीने दम तोडल्याचे आणि सेवा मंदावल्याचे कंपनीने जाहीर केले. त्याचा साईट आणि बुकिंग स्टिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना बुकिंग आणि दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वेळ लागत आहे. चेक इन प्रक्रियेला उशीर होत असल्याने विमानतळावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लवकरच समस्या सूटणार

दरम्यान कंपनीने ग्राहकांना ही समस्या लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन दिले आहे. विमान प्राधिकरणाच्या सहकार्याने लवकरच अडचण दूर होण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कंपनीने ट्विट करुन या गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने केलेल्या या खोळंब्यामुळे अनेकांची पुढील कामे थांबली आहेत. काहींना दुसऱ्या ठिकाणी अजून प्रवास करायचा होता. त्यांना फ्लाईट बदलून जायचे होते. पण त्या सर्वांसमोर आता अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. अनेक यात्रेकरू अजूनही विमानातच बसून आहे. त्यातील काही तर गेल्या तासाभरापासून विमान उड्डाणाची वाट पाहत आहेत. पण कंपनीने त्यांना कोणतीही सूचना दिली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. इंडिगोची ही नेहमीचीच बोंब असल्याचा सूर काही प्रवाशांनी आळवला आहे. त्यांनी कंपनीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.