Air IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले
आता तर कंपनीकडे पुरेसा स्टाफच नसल्याने पुढे काय होणार? असा प्रश्न अनेक प्रवाशांसमोर आहे.
मुंबई : एअर इंडिगोचा (Air Indigo) घोळ असूनही संपलेला नाही. कधी यांचा स्टाफ एखाद्या पॅसेंजरला नीट वागणूक देत नाही तर कधी यांचा स्टाफ वेळेवर हजरच नसतो. आजही असेच उदाहरण समोर आले आहे. कारण चक्क स्टाफ उपलब्ध (Crew Members) नसल्याने देशभरातील कित्येक प्रवासी विमानं (Flights) ही खोळंबली आहेत. या घोळामुळे प्रवाशी मात्र चांगलेच संतापल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वीच एअर इंडिगोला नागरी उड्डाण मंत्र्यांनी तंबी दिली होती. कारण यांच्या स्टाफने एका दिव्यांग व्यक्तीला नीट वागणूक दिली नव्हती. आता तर कंपनीकडे पुरेसा स्टाफच नसल्याने पुढे काय होणार? असा प्रश्न अनेक प्रवाशांसमोर आहे. केबिन क्रू आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे शनिवारी देशभरातील तब्बल 900 इंडिगो उड्डाणे उशीर झाली, अशी माहिती टाईम्स नाऊने दिली. एअरलाईनला रविवारीही कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला, असेही त्यात म्हटले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
Several IndiGo flights across the country delayed after the non-availability of crew members. pic.twitter.com/8km8evAQY1
— ANI (@ANI) July 3, 2022
DGCA या प्रकरणाची गंभीर दखल
दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोच्या विरोधात कठोर दखल घेतली आहे आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर उड्डाण विलंब होण्यामागे स्पष्टीकरण मागितले आहे, DGCA अधिकाऱ्यांनी ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचे दुसरे ट्विट
Directorate General of Civil Aviation (DGCA) has taken strong cognizance against IndiGo & sought a clarification/ explanation behind the massive flight delays nationwide: DGCA officials to ANI
— ANI (@ANI) July 3, 2022
कंपनीवर मोठी कारवाई होण्याची शक्यता
इंडिगो ही देशातील आघाडीची विमान कंपनी आहे. ज्याचे भारतात चांगले नेटवर्क आहे. एका आकडेवारीनुसार इंडिगो देशात दररोज 1600 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात. खरं तर, इंडिगो ही देशातील एक बजेट एअरलाइन म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रवाशांना प्रवास करणे आवडते. इंडिगो ही विमानसेवा जगतातील जीवनवाहिनी मानली जाते, मात्र शनिवारी अनेक विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याने इंडिगोच्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय उड्डयन मंत्रालयाने इंडिगोच्या उड्डाणांना होणार्या विलंबाबाबत माहितीही शेअर केली आहे. ज्या अंतर्गत शनिवारी इंडिगोची केवळ 45 टक्के उड्डाणे वेळेवर चालवण्यात आली. त्याचवेळी पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोठ्या संख्येने क्रू मेंबर्सनी आजारी रजा घेतली होती.