ITBP Viral Video : 15 हजार फूट उंची अन् हाडं गोठवणारी थंडी, इंडो तिबेटियन बॉर्डर जवानांचा योगा

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जवानांनी लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योगासने केली होती. 2015 पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. काही महिन्यांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

ITBP Viral Video : 15 हजार फूट उंची अन् हाडं गोठवणारी थंडी, इंडो तिबेटियन बॉर्डर जवानांचा योगा
इंडो तिबेटियन बॉर्डर जवानांचा योगा Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 4:11 PM

नवी दिल्ली – भारत-चीन (China–India) सीमेवर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये 15 हजार फूट उंचीवर हे जवान देशाचं संरक्षण करत आहेत. या जवानांचे अनेक किस्से आपण व्हिडीओच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहिले आहेत आणि ऐकले देखील आहेत. जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) आगोदर हिमालयातील बर्फावर योगा केला आहे. जवानांच्या एक तुकडीने हा योगा केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या बर्फात जवान उत्साहाने योगा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नेमकं व्हिडीओत काय आहे

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांना हिमवीर म्हटलं जातं. आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या निमित्ताने उत्तराखंड हिमालयातील 15,000 फूट उंचीवर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) चे हिमवीर योग सत्रात सहभागी झाले होते. त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये हिमवीर क्रॉस पाय लावून बसले आहेत. “हम है हिमवीर” अशी घोषणा ते देत आहेत. जवानांनी त्यांच्या चटईवर अनेक योगासने केली आहेत. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी त्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या आहेत.

लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योगासने केली होती

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जवानांनी लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योगासने केली होती. 2015 पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. काही महिन्यांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यामध्ये जवान थंडीत पुश-अप करताना दिसत होते. जमिनीपासून 17 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर 65 पुश-अप करत सैनिकांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.