H3N2 नंतर आता पुन्हा या व्हायरसने घातला धूमाकूळ ; तज्ज्ञांनी लक्षणे काय आणि उपायही सांगितले…

इन्फ्लूएंझा बी च्या संसर्गामुळे गंभीर आजार होत नसून त्याचा संसर्गही लवकर होत नाही. त्याचा संसर्ग झाल्यास घाबरण्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

H3N2 नंतर आता पुन्हा या व्हायरसने घातला धूमाकूळ ; तज्ज्ञांनी लक्षणे काय आणि उपायही सांगितले...
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 11:32 PM

नवी दिल्ली : भारतात कोविडच्या साथीनंतर आता नवे संकट येऊन उभा राहिले आहे. त्यातच देशात कोविड विषाणूनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे.राजधानी दिल्लीतील तीन प्रयोगशाळांमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या 30 टक्के झालेल्या तपासणीतील नमुन्यांमध्ये इन्फ्लूएंझा बी चे रुग्णही आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. तर डॉक्टरांनी सांगितले आहे की, हा देखील इन्फ्लूएंझा व्हायरसचाच एक उपप्रकार आहे. जो H3N2 सारखाच आहे.

इन्फ्लूएंझा बी च्या संसर्गामुळे खोकला-सर्दी आणि सौम्य प्रकारचा तापदेखील रुग्णांमध्ये आढळून येतो आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, इन्फ्लूएंझा व्हायरसचे चार उपप्रकार आहेत. यामध्ये इन्फ्लूएंझा ए, बी, सी आणि डी यांचा समावेश आहे.

H3N2 हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार व्हायरस आहे. जो H1N1 पासून उत्परिवर्तन होऊन तयार होतो. तर, इन्फ्लूएंझा बीचा कोणताही उपप्रकार नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

त्याचे स्ट्रेन वेगवेगळे असू शकतात. यामुळे तो गंभीर स्वरूप धारण करत नाही आणि कोणत्याही साथीचा धोकाही त्यापासून संभवत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील ज्येष्ठ चिकित्सक डॉ. कमलजीत सिंग कैंथ यांनी स्पष्ट केले आहे की, इन्फ्लूएंझा बी हा देखील फ्लू आहे. त्यामुळे सर्दी-खोकला, घसादुखी, सौम्य ताप अशा तक्रारी नागरिकांना येऊ शकतात.

या हंगामामध्ये इन्फ्लूएंझा बी चीही प्रकरणं सापडली आहेत. मात्र इन्फ्लूएंझा ए च्या उपप्रकार H3N2 पेक्षा हे कमी सांसर्गिक आहे.

इन्फ्लूएंझा बी च्या संसर्गामुळे गंभीर आजार होत नसून त्याचा संसर्गही लवकर होत नाही. त्याचा संसर्ग झाल्यास घाबरण्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

बचाव कसा करायचा

डॉ. सिंग यांनी यापासून बचाव करण्यासाठी कोविड आणि एच3एन2 सारख्याच पद्धती आहेत. त्यासाठी मास्क वापरा, स्वच्छतेची काळजी घ्या, हात स्वच्छ करत राहा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, ही वरील लक्षणे दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ल घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.