H3N2 बाबत शेजारील राज्याने दिला सतर्कतेचा इशारा; रुग्णांमध्ये होते झपाट्याने वाढ
या विषाणूची कोविडशी तुलना करणे चुकीचे असल्याचेही डॉ. रिचा यांनी सांगितले असून चाचणीशिवाय ते समजणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
नवी दिल्लीः कोरोनासारख्याचा इन्फ्लूएंझा (H3N2 विषाणू) चा देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात त्याचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत असून विविध प्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला असून रुग्णांची व्यवस्था रुग्णालयांमध्येही करण्यात येत आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी सल्लागार समितीची बैठक घेतली आहे. या वाढत्या प्रकरणांबाबत चर्चा करून पुढील कृती आराखड्यावरही चर्चा करण्यात आली आहे. त्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत.
आताच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्येही मास्क घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 15 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्ध लोकांना इन्फ्लूएंझाची अधिक लक्षणे आढळून येत असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. याचा त्रास गर्भवती महिलांनाही होत असून स्वच्छता राखणे, गर्दी टाळली गेली तर यापासून धोका टाळता येणार आहे.
या व्हायरसमुळे यावेळी बरेच लोक उपचार पद्धती घेत आहेत.तर बहुतांशी लोक लोक डॉक्टरांचे मार्गदर्शन न घेताच उपचार करत आहेत.त्यामुळे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी या सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
अशाप्रकारे सल्ल्याशिवाय औषध घेणे योग्य नसल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आता कर्नाटकातील परिस्थिती चिंताजनक असून उत्तर प्रदेशातही याचे रुग्ण वाढले आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये H3N2 विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. या परिस्थितीत डॉक्टर त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड बनवत आहेत.
यासोबतच कोविडसारखा मास्क घालण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. तर कानपूरमध्येही इन्फ्लूएंझाचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत. तेथील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
आतापर्यंत केलेल्या चाचणीमध्ये सर्व रुग्णांमध्ये या विषाणूची पुष्टी झालेली नाही, परंतु लक्षणे सारखीच दिसत आहेत. सध्या रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड पूर्णत: भरले गेले आहेत.
खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसत असून उत्तर प्रदेशात एका दिवसात 23 ते 24 रुग्ण आढळून येत आहेत. तर काहींना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले आहे.
या विषाणूची कोविडशी तुलना करणे चुकीचे असल्याचेही डॉ. रिचा यांनी सांगितले असून चाचणीशिवाय ते समजणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तसे, कर्नाटक-उत्तर प्रदेशबरोबरच पश्चिम बंगाल आणि दिल्ली-एनसीआरमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहेत. अमेरिका आणि हाँगकाँगमध्येदेखील या विषाणूने कहर केला असून तशाच पद्धतीने हे आता भारतातही सुरु आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, चार प्रकारचे हंगामी इन्फ्लूएंझा विषाणू आहेत – A, B, C आणि D. यामध्ये, मौसमी फ्लू A आणि B प्रकारातून पसरतो.
तथापि, यामध्ये, इन्फ्लूएंझा ए प्रकार महामारीचे कारण मानले जाते. इन्फ्लूएंझा प्रकार ए चे दोन उपप्रकार आहेत. एक H3N2 आणि दुसरा H1N1. त्याच वेळी, इन्फ्लूएंझा प्रकार बी मध्ये उपप्रकार नसतात, परंतु त्याचे अंश असू शकतात.
प्रकार C हा अतिशय सौम्य मानला जातो आणि धोकादायक नाही. तर D प्रकार गुरांमध्ये पसरतो. ICMR नुसार, कोविडची प्रकरणे काही महिन्यांत कमी झाली आहेत, परंतु H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
15 डिसेंबरपासून H3N2 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मौसमी इन्फ्लूएंझाच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला (सामान्यतः कोरडा), डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे आणि वाहणारे नाक यांचा समावेश होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.