PPF नियमांमध्ये बदल, खातेधारकांना महत्त्वाच्या पाच सूचना

सध्या प्रत्येक नोकरदार आपल्या भविष्यातील तरतुदीसाठी पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडाचा (PPF) विचार करतो (New PPF account rules).

PPF नियमांमध्ये बदल, खातेधारकांना महत्त्वाच्या पाच सूचना
खाजगी नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष संधी
Follow us
| Updated on: Dec 22, 2019 | 12:18 PM

नवी दिल्ली : सध्या प्रत्येक नोकरदार आपल्या भविष्यातील तरतुदीसाठी पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडाचा (PPF) विचार करतो (New PPF account rules). ही योजना सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानली जाते. अनेकजण या योजनेतील गुंतवणुकीलाच पसंती देतात. यातून कोणत्याही जोखमेशिवाय निश्चित असा परतावा मिळत असल्याने लोकांमधून याला प्राधान्यक्रम दिलं जातं (New PPF account rules).

दुसरीकडे या याजनेतील गुंतवणुकीमुळे कर बचत देखील होते. सध्या सरकारने पीपीएफशी संबंधित जुने नियम बदलले आहेत. हा करात सवलत मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. आता सरकारने PPF च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल खालीलप्रमाणे,

1.नव्या नियमाप्रमाणे PPF खातेधारक एका वर्षामध्ये कितीही वेळा पैसे जमा करु शकतो. या आधी एका आर्थिक वर्षामध्ये केवळ 12 वेळाच पैसे जमा करता येत होते. दरम्यान, 1 वर्षात एकूण 1.5 लाख रुपयेच जमा करता येऊ शकतात.

2. नव्या नियमानुसार PPF खातेधारकाच्या कर्जावरील व्याजदर 1 टक्के झाला आहे. आधी पीपीएफ खातेधारकाला घेतलेल्या कर्जासाठी 2 टक्के व्याज होते, ते आता 1 टक्के करण्यात आले.

3. खातेधारकाच्या मृत्यूनंतर कर्जावरील व्याजाची जबाबदारी खात्याच्या वारसाची असेल.

4. आता PPF खातेधारक कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या शाखेतून आपली कितीही पीएफ रक्कम काढू शकणार आहे. पोस्ट खात्याने यासाठी परवानगी दिली आहे. आधी याची मर्यादा 25 हजार रुपये इतकी होती.

5. नव्या नियमांनुसार PPF खातेधारकाला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व ग्रहण करायचं असेल तर त्या स्थितीत खात्याचा काळ पूर्ण होण्याआधीच बंद करता येणार आहे. याआधी हा नियम अस्तित्वात नव्हता. पीएफ खात्याची कालमर्यादा पूर्ण होण्याआधीच बंद करायचं असेल, तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. यात संबंधित खातेधारकाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असेल तर संबंधित खाते बंद करता येईल ही एक तरतूद आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.