हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा भारतात उगम, अफवा की सत्य ? केंद्र सरकारनं दिली खरी माहिती
विषाणूची उत्पत्ती भारतातच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतोय. याच दाव्याची गंभीर दखल घेऊन भारत सरकारने त्याबद्दल अधिकृत मत मांडले आहे. (india second wave corona virus)
नवी दिल्ली : भारत देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona second wave) सामना करत आहे. कोरोनाच्या या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच या वेळी मृतांचे प्रमाणसुद्धा चांगलेच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात हाहा:कार माजवणाऱ्या नव्या कोरोना विषाणूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या कोरोना विषाणूची सविस्तर माहिती दिल्यानंतर या विषाणूची उत्पत्ती भारतातच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतोय. याच दाव्याची गंभीर दखल घेऊन भारत सरकारने त्याबद्दल अधिकृत मत मांडले आहे. (information of second wave and origin of new Corona virus found in India)
कोरोनाचा नवा B.1.617 विषाणू काय आहे ?
संपूर्ण जग सध्या कोरोना महासाथीचा सामना करतंय. या महासाथीमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमवले आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाचा विषाणू आपल्या जणूकांमध्ये बदल करतोय. याच कारणामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोनाचा B.1.617 नावाचा नवा विषाणू (नवा व्हेरियंट) समोर आला आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सविस्तर माहिती दिली आहे. या विषाणूबद्दल माहिती देताना WHO ने तब्बल 32 पाणी दास्तऐवज तयार केलाय. ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 हा कोरोनाचा नवा विषाणू तब्बल 44 देशांमध्ये आढल्याचे सांगितले आहे.
कोरोनाचा B.1.617 हा विषाणू भारतातून आला ?
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 या नव्या रुपाबद्दल माहिती दिल्यानंतर संपूर्ण जगामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक माध्यमांनी B.1.617 या कोरोनाच्या नव्या रुपाला ‘कोरोनाचा भारतीय व्हेरियंट’ असं संबोधलंय. मात्र, याच गोष्टीवर भारत सरकारने आक्षेप घेतलाय. भारत सरकारने जागितक आरोग्य संघटनेने आपल्या 32 पानी माहितीमध्ये कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट भारतीय असल्याचे कोठेही नमूद केलेले नाही. तसेच WHO ने दिलेल्या माहितीमध्ये B.1.617 व्हेरियंट फक्त भारतच नाही तर जगातील बऱ्याच देशांमध्ये पसरल्याचे सांगितले आहे. एकूण 44 देशांमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे हा भारतीय व्हेरियंट आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
लसीकरणानंतर विषाणूचा प्रभाव कमी
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमध्ये B.1.617 हा व्हेरियंट हा कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे, असं सांगण्यात आलंय. तसेच या विषाणूचा संसर्ग पहिल्या विषाणूच्या तुलनेत लवकर आणि सहज पद्धतीने होऊ शकतो, असंसुद्धा WHO ने सांगितलंय. B.1.617 विषाणूच्या याच गुणधर्मामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढत आहे. लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाच्या B.1.617 या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेसुद्धा जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Coronavirus LIVE Update : वर्ध्यातील कडक निर्बंधांत आणखी पाच दिवसांची वाढ
Video: कोरोनावर देशी दारुचा काढा गुणकरी ठरत असल्याचा दावा, नगरच्या डॉक्टरची देशात चर्चा
(information of second wave and origin of new Corona virus found in India)