रील्स स्टार्ससाठी महत्त्वाची बातमी, इन्स्टावर फेमस होण्यासाठी 100 फूटावरून पाण्यात घेतली उडी अन् झाला उलटाच गेम
इन्स्टावर फेमस होण्यासाठी आता कोण काय करेल काही सांगता येत नाही. एक जरी रील व्हायरल झाला तरी रील करणाऱ्यांचा उत्साह वाढतो. त्यानंतर ते आणखीन रील व्हायरल होण्यासाठी काहीना काही करतात. मात्र इन्स्टावर व्हायरल होणं एका तरूणाच्या जीवाशी आलं आहे.
सोशल मीडियावर आता घराघरात रीलस्टार पाहायला मिळत आहेत. रील्स करण्याच्या नादात ते इतके गुंग होत आहेत की त्यांना आजुबाजूला काय सुरू आहे याचं भान राहिलेलं नाही. रील करण्याच्या नादात अनेक अपघात घडल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने रील्स करण्याच्या नादात आपली जीव गमवला आहे. युवकाला रील करणं अंगलट आलं, नेमका कोणती रील बनवत होता? संपूर्ण घटना जाणून घ्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
तौसिफ असं मृत तरूणाचं नाव असून तो अंघोळीसाठी मित्रांसोबत तलावाकडे गेला होता. तौसिफ यांच्या गावात करम डोंगराजवळ एक खाण असून तिथेच हा पाण्याचा तलाव आहे. त्यावेळी तौसिफने एक साहसी रील करण्याचं ठरवलं. पण असं करण त्यांच्या जीवाशी आलं. हा रील म्हणजे तौसिफने १०० फूट उंचीवरून खोल पाण्यात उडी मारायची.
तौसिफ याने १०० फूटावरून उडी मारली खरी पण होत्याचं नव्हतं झालं. 100 फूट खोल पाण्यात उडी मारल्यानंतर तरुणाला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याचे मित्र व्हिडीओ शुट करत होते मात्र उडी मारलेला तौसिफ पाण्याबाहेर आला नाही. तौसिफ हा 18 वर्षांचा होता, तरूण वयात रील्सच्या नादामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील आहे.
दरम्यान, पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवं. कारण आता मोबाईल आणि सोशल मीडिया ही व्यसनाप्रमाणे झाली आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवा.