MP Crime : इंदूरमध्ये टँकरमधून एलपीजी गॅस चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; विशेष टास्क फोर्सची कारवाई

अटक करण्यात आलेले आरोपी पिटोळ गावात घरामागील टँकरमधून एलपीजी गॅसची चोरी करत होते. चोरट्यांनी चोरीसाठी स्वत:चा सेटअपही तयार केला होता. मुख्य गुंड महेश सोलंकी आणि शिवनारायण सोळंकी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. अनेक दिवसांपासून ते ही टोळी चालवत होते.

MP Crime : इंदूरमध्ये टँकरमधून एलपीजी गॅस चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; विशेष टास्क फोर्सची कारवाई
गॅस सिलिंडर महागला Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:20 AM

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विशेष टास्क फोर्सने (STF) टँकरमधून एलपीजी गॅस (LPG Gas) चोरणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीतील 8 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या टोळ्यांतील गुन्हेगार गुजरात-महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर गुन्हे करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळ काढायचे. पोलीस चौकशीत टोळीच्या विविध कारनाम्यांचा उलगडा झाला असून अधिक तपासातून आणखी धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टोळी अनेक महिन्यांपासून सक्रिय

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून जाणाऱ्या महामार्गावरील मोठ्या टँकरमधून एलपीजी चोरी केली जात होती. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराज्य टोळीचा जोरदार सुळसुळाट सुरु होता. टोळीच्या कारनाम्यांची गुप्त माहिती मिळताच इंदूरच्या एसटीएफने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आणि आठ जणांना अटक करण्यात आली. झाबुआ जिल्ह्यातील पिटोल गावात हे आरोपी टँकरमधून एलपीजी चोरी करत होते.

दररोज रात्री 200 हून अधिक टँकरमधून 50 टन गॅसची चोरी

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या टँकरमधून एलपीजी चोरणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याच्या तक्रारी येत असायच्या. अनेक दिवसांपासून विशेष टास्क फोर्स इंदूरला खबरींकडून या तक्रारी येत होत्या. महामार्गावरील ढाबे आणि वजनकाट्याच्या नेटवर्कच्या मदतीने दररोज रात्री 200 हून अधिक टँकरमधून 50 टन गॅसची चोरी होत होती. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एसटीएफने झाबुआ जिल्ह्यातील पिटोल गावात छापा टाकला. या पथकाने मुख्य गुंड महेश सोळंकीसह आठ गुन्हेगारांना पकडले. महाराष्ट्रातील पेट्रोल पंप, वेल्डिंग कंपन्या आणि पिटोळ गावातून काही लोकांना अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

75 रुपयांच्या गॅसची अवघ्या 22 रुपयांना खरेदी

अटक करण्यात आलेले आरोपी पिटोळ गावात घरामागील टँकरमधून एलपीजी गॅसची चोरी करत होते. चोरट्यांनी चोरीसाठी स्वत:चा सेटअपही तयार केला होता. मुख्य गुंड महेश सोलंकी आणि शिवनारायण सोळंकी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. अनेक दिवसांपासून ते ही टोळी चालवत होते. आरोपींनी 75 रुपये किलो गॅस मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील टँकर चालकांकडून अवघ्या 22 रुपयांना विकत घेतला होता. तो गॅस नंतर इतर राज्यांतील टोळीचे सदस्य असलेल्या फॅब्रिकेटर्सना 44 रुपये किलोने विकायचे. हा प्रकार उघडकीस येताच तपास अधिकारी चक्रावून गेले आहेत. (Interstate gang busted for stealing LPG from tanker in Indore)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.