IRCTC UPDATE | फायरवॉलमुळे रेल्वेची तिकीट यंत्रणा ठप्प, 12 तासांपासून गोंधळ, देशभर फटका, एटीव्हीएम बंद पडले

भारतीय रेल्वेने रोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेची ऑनलाईन तिकीट यंत्रणा आयआरसीटीसी भक्कम मानली जाते. सेंकदाला सातशे तिकीट काढण्याचा तिचा आवाका थक्कं करणारा आहे. परंतू मंगळवारी रात्री 3.30 वाजल्यापासून ही यंत्रणा सपशेल कोलमडली आहे.

IRCTC UPDATE | फायरवॉलमुळे रेल्वेची तिकीट यंत्रणा ठप्प, 12 तासांपासून गोंधळ, देशभर फटका, एटीव्हीएम बंद पडले
extra prs counter on central railwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 4:42 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : भारतीय रेल्वेची तिकीट बुकींग यंत्रणा सांभाळणारी आयआरसीटीसीची वेबसाईट गेल्या 12 तासांपासून बंद पडली आहे. यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमके कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे देशभरातील रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसला आहे. या बिघाडाचा फटका रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रणेलाही बसला आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम बंद पडल्याने तिकीट खिडक्यांवरील रांगामध्ये वाढच होत चालली आहे. मध्ये रेल्वेने लांबपल्ल्यांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी 12 अतिरिक्त पीआरएस विंडो सुरु केल्या आहेत.

रेल्वेच्या क्रिस यंत्रणेमार्फत रेल्वे ऑनलाईन तिकीट यंत्रणेचे सॉफ्टवेअर विकसित केले गेले आहे. या सॉफ्टवेअरच्या फायरवॉलला काही परिणाम झाल्याने हा ट्रान्झंकशन फेल होत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने मुंबई डीव्हीजनमध्ये रेल्वे स्थानकांवर 12 अतिरिक्त पीआरएस काऊंटर उघडून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही पीआरएस काऊंटर पुढील प्रमाणे आहेत. सीएसएमटी ( 5) कल्याण ( 2) , ठाणे (1 ), भायखळा (1), वाशी (1 ), मुलुंड (1 ) , बदलापूर (1 ), चेंबुर (1 ) आदी ठिकाणी 12 प्रवासी रिझर्व्हेशन केंद्रे उघडण्यात आली आहेत.

आयआरसीटीसीचे शेअर कोसळले

अलीकडेच आयआरसीटीसीमध्ये अदानी ग्रुपचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या प्रवेशाने फायद्यात असलेल्या आणखी एका उपक्रमाचे खाजगीकरण होणार आहे. दरम्यान आजच्या तिकीट बुकींग गोंधळाने एरव्ही जोमात असलेला आयआरसीटीसीचा शेअर कोसळला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.