irctc : आपल्या बजेटमध्ये करा तिरुपती बालाजी-रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग यात्रा, पाहा काय सुविधा
आयआरसीटीसी कंपनीने दक्षिण दर्शन यात्रा आयोजित केलेली आहे. यात तुम्हाला तिरुपती बालाजी दर्शनासह दक्षिणेतील सर्व स्थळांना भेट देता येणार आहे.
जर तुम्हाला माफक खर्चात अत्यंत सुरक्षितपणे कुटुंबासह तिर्थाटन करायचे असेल भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने धार्मिक यात्रेची अमूल्य संधी आणली आहे. देशातील भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारा ‘दक्षिण दर्शन यात्रा’ चालविण्यात येत आहे. 17 ऑक्टोबरपासून या ‘भारत गौरव ट्रेन’ अंतर्गत “दक्षिण दर्शन यात्रा” राजकोटहून सुरु होणार आहे. चला या तीर्थ यात्रेला किती येणार आहे खर्च आणि काय आहेत सुविधा ते पाहूयात…ही संपूर्ण यात्रा 10 दिवसांची असणार आहे.
या टुर पॅकेज बोर्डिंग स्थानके खालील प्रमाणे
10 रात्र आणि 11 दिवसांची असणार आहे. ज्याचे बोर्डिंग पॉईंट राजकोट, सुरेंद्रनगर – वीरमगाम – साबरमती – नडियाड – आनंद – वडोदरा – भरूच – सूरत – वापी – वसई रोड – कल्याण – पुणे – सोलापुर असे आहे.
कुठे फिरता येणार ?
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला भारत गौरव ट्रेन द्वारे तिरुपती बालाजी, पद्मावती मंदिर, रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग मंदिर, मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारी आणि श्री पद्मनाभस्वामी मंदिरा्ंचे दर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
सुरक्षेसाठी असतील सीसीटीव्ही कॅमरे
आपल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास घडविण्यासाठी आयआरसीटीसी कठिबद्ध आहे. प्रवाशांना या ट्रेनमध्ये मनोरंजन होण्यासाठी तसेच प्रवासाची तिर्थस्थळांची माहिती देण्यासाठी इंफोटेनमेंट सिस्टमची सुविधा पुरविलेली आहे.
सुरक्षेसाठी प्रत्येक कोचमध्ये सुरक्षा गार्ड आणि सीसीटीव्ही कॅमरे यांची व्यवस्था याचा अंतर्भाव या टूर पॅकेजच्या किंमतीत समाविष्ठ केलेला आहे. आधुनिक किचन कार, जागेवर शुद्ध शाकाहारी जेवण, बसने प्रदर्शनीय स्थळे पाहण्याची व्यवस्था आहे. बजेटमध्ये हॉटेल निवास, गाईड आणि अपघात विमा आणि सुविधा या टुर मध्ये असणार आहेत.
किती असेल भाडे
जर तुम्ही इकॉनॉमी क्लाससाठी (स्लीपर) तिकीट बुक कराल तर तुम्हाला 19,930/- रुपये , कम्फर्ट क्लाससाठी थर्ड एसीसाठी रुपये 35,930/- आणि कम्फर्ट क्लास – 2 एसीसाठी रु. 43,865/- खर्च करावा लागेल.या यात्रेत आयआरसीटीसीतर्फे LTC ची सुविधा देखील दिली जाणार आहे.
उत्तराखंडातील पाच प्रयागांचे दर्शन
याशिवाय, आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास बोर्डद्वारा “पितृ छाया एक्सप्रेस” ( एक यात्रा पितरांच्या नावे ) उत्तराखंडातील पांच प्रयागासाठी आणि शेवटी बंद्रीनाथजवळील ब्रह्म कपालमध्ये भक्तांना आपल्या पूर्वजांना श्रध्दांजली देण्याची संधी मिळाली.
10 दिवसांची असेल ट्रिप
ही ट्रिप 09 रात्र आणि 10 दिवसांची असेल, ही तिर्थयात्रा 20-09-2024पासून पुण्याहून सुरु होईल
किती असेल भाडे
गुजरातचे भाविक अहमदाबाद, वापी, सूरत आणि वडोदराहून ट्रेन पकडू शकतील. टूर पॅकेजमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग आणि बद्रीनाथचे दर्शन करण्याची संधी मिळेल. यात्रेचा पॅकेज मूल्य रु. 44,990/-आहे.
ही टुर थर्ड एसी कोचमधून असेल आणि प्रवाशांच्या सोयीसाठी 4 बर्थ बुक केल्या जातील. टुरमध्ये शुद्ध शाकाहारी भोजनाची सोय असेल. टुरसाठी नॉन- एसी बसेसची सुविधा असेल. प्रवासात शुद्ध शाकाहारी भोजनाची सोय असणार आहे. प्रवासासाठी नॉन-एसी बसेस उपलब्ध केली जाईल. आणि हरिद्वार, ऋषिकेश, रुद्रप्रयाग आणि जोशीमठ सहित विभिन्न स्थानांवर होमस्टे, गेस्ट हाऊस, बजट होटलात भोजनासह निवासाची सोय केली जाणार आहे.
खालील दिलेल्या लिंक बुक करावी
IRCTC द्वारा टूर पॅकेजची बुकिंग सुरू झाली आहे, “EMI ने बुक करा पॅकेज” ही सुविधा केवळ ऑनलाइन बुकींगसाठी उपलब्ध आहेत. IRCTC च्या वेबसाईट (www.irctctourism.com) वर लॉग इन करु शकता आणि आणि टूर पॅकेज ऑनलाइन बुक करु शकणार आहे.