भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी आहे का ? काय आहेत नियम ?

भारतात राहुन विदेशी नागरिकत्व स्वीकारता येते का ? या संदर्भात भारतीय घटनेत नियम स्पष्ट करण्यात आलेले आहे. काय आहेत नेमके दुहेरी नागरिकत्वाचे नियम पाहूयात...

भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी आहे का ? काय आहेत नियम ?
Dual Citizenship
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 4:56 PM

भारतात अनेकदा देशात राहणाऱ्या व्यक्तीकडे परदेशी नागरिकत्व देखील असल्याचे उघडकीस आले होते. अशात मग भारतात राहणाऱ्या नागरिकाला दोन नागरिकत्व ठेवण्याचा अधिकार आहे का ? त्याला भारतीय नागरिक मानले जाईल का ?या प्रश्नाचे उत्तर भारतीय घटनेत दिलेले आहे. ज्यात दुहेरी नागरिकत्वा संदर्भात काय नियम आहेत याची माहिती दिलेली आहे. भारतीय घटनेच्या कलम ८ नुसार परदेशी नागरिकाला देखील भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. परंतू त्यासाठी काही अटी आहेत. परंतू भारतीय नागरिकाजवळ जर परदेशी नागरिकत्व असेल तर त्याला भारतात राहण्याची परवानगी मिळेल का? त्याला दुहेरी नागरिकत्व बाळगता येईल का ? काय आहे कायदा पाहा…

भारतात दुहेरी नागरिकत्व ठेवता येते का याचे उत्तर इंडियन सिटीझन शिप एक्ट १९९५ मध्ये आहे. कायद्याप्रमाणे भारतात कोणत्याही भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व बाळगण्याचा अधिकार नाही. जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. आणि तुम्हाला दुसऱ्या देशाचा पासपोर्ट हवा असेल तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सरेंडर करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर परदेशी नागरिकत्व मिळवले तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावे लागते.

परदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय पासपोर्ट बाळगणे भारतीय पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत गुन्हा मानला जातो. सरेंडर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला नजीकच्या बीएलएस सेंटरवर जावे लागेल आणि प्रक्रीया सुरु करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सरेंडर सर्टीफीकेट मिळेल, हे पुरावा म्हणून तुमच्याजवळ असेल आणि भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्यानंतर परदेशी नागरिकाप्रमाणे येथे राहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

सरेंडर सर्टीफिकेटची आवश्यकता

भारतीय व्हीसा, ओसीआय कार्ड आणि अन्य दुतावासीय सेवेसाठी तुम्हाला सरेंडर सर्टीफिकेटची आवश्यकता असते. गृहमंत्रालय पोर्टलवरुन ऑनलाईन घोषणा करुनही भारतीय नागरिकता त्याग करता येते. भारत सरकार भारतीय मुळाच्या काही व्यक्तींना परदेशी नागरिकत्व ( ओसीआय ) कार्डधारक रुपात नोंदणी करते. ओसीआय अनिवार्य रुपात अन्य विशेषाधिकारांसह एक आजीवन व्हीसा आहे. तरी ओसीआय कार्ड धारकाला दुहेरी नागरिकत्वाचा दावा करण्याचा अधिकार नाही.

भारतीय नागरिकता कशी मिळते ?

भारतीय नागरिकत्व मिळण्याचे अनेक नियम आहे.

१ – भारतीय नागरिकाशी विवाह करुन – जर कोणा भारतीयाचा परदेशी तरुण किंवा तरुणीशी विवाह झाला तर त्याला भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज करता येतो

२ – ११ ते १५ वर्ष भारतात काढले – जर कोणा विदेशी नागरिकाने भारतात ११ ते १५ वर्षे काढली असतील. तर असा न व्यक्ती भारतात नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो

३ – अल्पसंख्यांक असल्यास – भारता परदेशी रिलीजियस मायनॉरिटीना नागरिकत्व मिळण्याचा नियम आहे. सिटीझन अमेंडमेंट एक्ट ( CAA ) अंतर्गत पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अफगाणिस्तानात किंवा शेजारील देशातील अल्पसंख्यांक अर्थात रिलीजियस मायनॉरिटी अंतर्गत येत असेल आणि त्याला तेथे धर्मावरुन छळ केलेला असेल आणि तो ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आला असेल तर तो नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो.

४ – संविधान आधारे – जेव्हा भारतात संविधान लागू झाले तेव्हा भारतात जे लोक रहात होते. त्यांना भारतीय नागरिकत्व आपोआप मिळालेले आहे. मग भलेही त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतील.

५ – जन्माआधारे – भारतात जन्मलेल्या मुलाला जन्म घेताच भारतीय नागरिकत्व मिळते.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...