Chandrayaan-3 | भारताच्या चंद्रयान-3 मोहीमेची अखेर झाली का ? शिवशक्ती पॉईंटवर रात्रीचा अंधार पसरला
चंद्रयान-3 मोहिम 14 दिवसांसाठीच तयार केली होती. परंतू रोव्हर प्रज्ञान पुन्हा जागृत होण्याचा चमत्कार होतो का याची वाट पाहीली जात आहे. परंतू चंद्राच्या शिवशक्ती पॉइंटवर पुन्हा दुसरी रात्र सुरु झाली आहे.
नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : चंद्रावर पुन्हा सुर्य मावळला आहे. याबरोबरच चंद्रयान-3 चे रोव्हर आणि लॅंडर पुन्हा सक्रीय होऊन काही चमत्कार घडवतील ही अपेक्षा आता मावळत चालली आहे. चंद्रावर पुन्हा रात्र झाल्यामुळे दक्षिण ध्रुवावरील शिवशक्ती पॉईंट पुन्हा अंधारात बुडाला आहे. येथेच चंद्रयान-3 ने यशस्वी लॅंडींग करुन साऱ्या जगाला आश्चर्यचकीत केले होते. पृथ्वीवरील एक दिवस चंद्रावर 14 दिवसांच्या बरोबर असतो. आता शिवशक्ती पॉइंटवर 30 सप्टेंबरपासून सुर्याचा प्रकाश नाहीसा होत आहे. त्यामुळे प्रज्ञान आणि विक्रम पुन्हा सक्रीय होतील का ? असा सवाल निर्माण झाला आहे.
भारतच्या चंद्रयान-3 मोहीमेच्या तीन तारखा कायम लक्षात राहतील. पहिली म्हणजे 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान-3 लॉंच करण्यात आले. दुसरी तारीख 23 ऑगस्ट 2023 ..या दिवशी चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. आणि अंतिम महत्वाची तारीख 3 सप्टेंबर 2023 या दिवशी या मिशनचा महत्वाचा भाग असलेला प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेला. त्यानंतर आतापर्यंत प्रज्ञान आणि विक्रम यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे हे मिशन संपले का असा सवाल निर्माण झाला आहे.
लॅंडींग नंतर दहा दिवस चांगले काम केल्यानंतर चंद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर साऊथ पोलवर सुरक्षित जागी पार्क केला होता. त्यामागे जेव्हा 11 दिवसांनी जेव्हा सुर्य उगवेल तेव्हा याच्या सोलर पॅनलवर प्रकाश पडून तो सक्रीय होईल अशी आशा होती. परंतू असे काही घडलेले नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या शिवशक्ती पॉइंटवर चंद्रयान-3 लॅंड झाले होते. त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर रोव्हर उभा आहे.
आपल्यापर्यंत भरपूर डाटा पाठविला…
लॅंडींगनंतर प्रज्ञान रोव्हरवर लावलेल्या दोन पेलोड APXS आणि LIBS मध्ये सर्व डाटा एकत्र केला आहे. आणि बंद पडण्यापूर्वी हा डाटा पृथ्वीवर संशोधकांकडे पाठवला आहे. यातील काही माहीती अजूनपर्यंत जगासमोर आली नव्हती. चद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर उतरणारे एकमेव मिशन आहे. त्यामुळे याच्याकडून खूप अपेक्षा होती. इस्रोच्या संशोधकांना अजूनही आशा आहे की एकदिवस सुर्याच्या उजेडाबरोबर प्रज्ञान रोव्हर चालू लागेल आणि त्याचा पृथ्वीशी संपर्क होऊ शकेल. परंतू तो दिवस केव्हा उजाडणार हा सवाल निर्माण झाला आहे.