आपल्या हृदयाचे मंदिर झाले पाहिजे, तरच सुख आणि शांती नांदेल, इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांचे मत

मुंबईतील बंगाली बांधवाच्या दुर्गा पूजा उत्साहाला सुरुवात झाली आहे. माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या सभागृहात ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 12 ऑक्टोबरपर्यंत तो चालणार आहे.

आपल्या हृदयाचे मंदिर झाले पाहिजे, तरच सुख आणि शांती नांदेल, इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांचे मत
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 9:15 PM

गरजा कधीच संपत नाहीत, प्रत्येकाला नंबर वन व्हायचे आहे. माणसाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात त्याला मिळणारे जीवन यात अंतर असल्याने माणसाला नैराश्याने घेरले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयात मंदिर बांधवे, दुसऱ्याला मदत करावी तरच खरे समाधान सुख आणि शांती मिळेल असे इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांनी भगवतगीतेवरील आपल्या प्रवचनात सांगितले. ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्यावतीने माटुंगा येथील एसएनडीटी कॉलेजातील सभागृहात आयोजित दुर्गा महोत्सवात गौरंग दास प्रभुजी यांचे भगवतगीतेवर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.

अहंकारामुळे दुर्योधनाचा विनाश झाला. दुर्योधन चांगल्या कारणासाठी लढला नाही. व्यक्तीने अहंकारावर मात करायला हवी. आपणच नंबर वन असायला हवे आपल्याखेरीज दुसरे कोणी असूच नये अशी महत्वाकांक्षा जगाला विनाशाकडे नेत आहे. दुर्याधनाला कुरुक्षेत्राच्या उन्हातही डोक्यावर छत्र धरणाराही कोणी नको होता. कारण त्याला आपल्या पेक्षा कोणी मोठे होतेय याची सतत भीती वाटायची. प्रत्येकाने अहंकारावर मात केली आणि हृदयाला आणि घराला मंदिर केले तर सुख आणि शांती नांदेल असेही गौरंग दास प्रभुजी यावेळी म्हणाले.मुंबईतील बंगाली लोकांच्या दुर्गा पूजा महोत्सवाचे उद्घाटन इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांच्या हस्ते माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी होईचोई आनंदो फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजीत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संदीपान आणि टीव्ही 9 नेटवर्कच्या डिस्ट्रीब्यूशन डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट धीरेंद्र सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

मुंबईतील बंगाली बांधवाचा उत्साह

मुंबईतील बंगाली बांधव मुंबईत मोठ्या उत्साहाने दुर्गा पूजा साजरी करीत असतात. ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील मांटुगा येथे दुर्गापूजेचा महोत्सव सुरु झाला आहे. 9 ते 12 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.महाराष्ट्रातील गणेशोत्सवा प्रमाणे बंगालमध्ये दुर्गा पूजा केली जाते. महाराष्ट्रात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी घटस्थापना झाली. परंतू बंगाली लोक शारदीय नवरात्री सहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल षष्ठी तिथि (महा षष्ठी) दुर्गा पूजा सुरु करत असतात.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.