Israel-Hamas War | मिझोरम, मणिपूरचे मूळ रहिवाशी इस्त्राईलच्या लष्करात, Hamas शी करणार दोन हात

Israel-Hamas War | भारत जन्मलेले शेकडो जण हमासचे कंबरडे मोडण्यासाठी इस्त्राईलच्या लष्करात दाखल झाले आहे. इस्त्राईलने हमास हल्ल्यानंतर त्यांचे सैन्य जमा केले. त्यात भारतीय भूमीशी घट्ट नाळ असलेल्या अनेक तरुणांचा समावेश आहे. उत्तर पूर्वेतील राज्य मिझोरम आणि मणिपूर यांच्याशी त्यांचे खास कनेक्शन आहेत, कोण आहेत ही लोक?

Israel-Hamas War | मिझोरम, मणिपूरचे मूळ रहिवाशी इस्त्राईलच्या लष्करात, Hamas शी करणार दोन हात
Israel Hamas War Mizo bnei Menashe ६
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 3:05 PM

नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास युद्ध निर्णयाक वळणावर येऊन ठेपले आहे. हवाई आणि क्षेपणास्र हल्ल्यानंतर आता इस्त्राईल जमिनीवरील हल्ले तीव्र करणार आहे. हमासचे महत्वाचे म्होरके टिपण सुरुच आहे. हमासचा खात्मा हे लक्ष्य समोर ठेऊन इस्त्राईल आगेकूच करत आहे. जमिनीवरील लढाईत भारतात जन्मलेल्या शेकडो तरुणांचा समावेश आहे. इस्त्राईल सरकारने हाक देताच हे तरुण तातडीने लष्करात कर्तव्यावर हजर झाले आहे. त्यांची अजूनही भारताशी घट्ट नाळ जोडलेली आहे. उत्तर पूर्वीतील मिझोरम आणि मणिपूर या राज्याशी त्यांचे खास कनेक्शन आहेत? कोण आहेत ही मंडळी?

भारतीयांनी संभाळला मोर्चा

इस्त्राईलमधील जेरुसलेम येथील 29 वर्षांचा एलाजार चुंगथांग मेनाशे (Eleazar Chungthang Menashe) लष्कराच्या आदेशाची वाट पाहत आहे. त्याने सध्या गाझा पट्टीच्या सीमारेषेवर मोर्चा संभाळला आहे. त्याचा जन्म मणिपूर येथे झाला. आता सध्या तो लष्करात कर्तव्यावर आहे. सध्या तोच एकमेव मूळ भारतीय या युद्धात सहभागी नाहीत. अनेक जण आहेत. तो भारतातील बेने मेनाशे या ज्यूंचा प्रतिनिधी आहे.

हे सुद्धा वाचा

युद्ध निर्णयाक स्थितीत

7 ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी इस्त्राईलवर रॉकेट हल्ले केले होते. त्यात जवळपास 1300 नागरिकांसह लष्करातील जवानांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर इस्रायलने लष्कराने तातडीने कर्तव्यासाठी 3,60,000 राखीव सैनिकांना बोलावले. गाझा पट्टीत इस्त्राईल हल्ल्यानंतर 1,900 पॅलेस्टाईनचा मृत्यू ओढावला आहे. भारतात जन्म झालेले अनेक तरुण या आवाहनानंतर लागलीच युद्धात सहभागी झाले आहेत.

अनेकांना लष्करी सन्मान

एलाजार चुंगथांग मेनाशे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी यापूर्वी झालेल्या युद्धात हमासला चांगलाच धडा शिकवला होता. त्यांनी अविश्वसनीय आणि अद्भूत शौर्य गाजवले. त्यामुळे इस्त्राईलच्या लष्कराने त्यांचा मोठा सन्मान केला आहे. हमासच्या कारवायांना आळा घालण्यासाठी त्यातील काहींनी प्राणाची आहुती सुद्धा दिली आहे. इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 85,000 ज्यू आहेत.

भारताशी जुने संबंध

बेने इस्त्राईली भारतात अलिबाग येथे 2,400 वर्षांपूर्वी दाखल झाले. त्यांची संख्या भारतात 75 हजारांच्या घरात होती. 4,000 बेने इस्त्राईलींनी भारत सोडला आहे. ते इस्त्राईलमध्ये स्थायिक झाले आहेत. पण त्यांचे अनेक नातेवाईक आणि आप्तेष्ट अजूनही भारतात आहेत. तर बेने मेनाशे यांच्या दाव्यानुसार ते इस्त्राईलमधून अनेक शतकांपूर्वी चीनकडे निघाले. पण वाटेत ते भारत आणि म्यानमार यांच्या सीमावर्ती भागात स्थिरावले. आता हा भाग मिझोरम आणि मणिपूर या राज्यात मोडतो. इस्त्राईलमधील ज्या 10 जमाती नामशेष झाल्या. बेने मेनाशे ही त्यातील एक जमात असल्याचा त्यांचा दावा आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.