Israel-Hamas War | पॅलेस्टाईनला आली भारतीची आठवण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले हे साकडे

Israel-Hamas War | एका आठवड्यानंतर का होईना आठवण आली आहे. हमासने आगळीक केल्याने युद्धाला तोंड फुटले. लेबनॉन, इराण आणि सीरीयाच्या जीवावर हमास उड्या मारत आहे. तर अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला आर्थिक रसद पुरवली आहे. पण इस्त्राईल मागे हटायला तयार नाही. त्यामुळे पॅलेस्टाईनने भारताला हे साकडे घातले आहे.

Israel-Hamas War | पॅलेस्टाईनला आली भारतीची आठवण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले हे साकडे
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 5:12 PM

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या शुक्रवारी रात्री इस्त्राईलवर अचानक हल्ला चढवला. त्यामुळे युद्धाला तोंड फुटले. त्याला लागलीच इस्त्राईलने प्रत्युत्तर दिले आहे. गाझा पट्टीची कोंडी करत आता जमिनीवरुन मारा करण्यात येत आहे. गाझा पट्टीत हमासने जमिनीखाली सुरुंगांचे मोठे जाळे विणले आहे. हे जाळे उद्धवस्त करण्याचा आणि दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा चंग इस्त्राईलने बांधला आहे. आठवडाभरानंतर पॅलेस्टाईनला भारताची आठवण आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे साकडे घालण्यात आले आहे.

भारताचा इस्त्राईलला पाठिंबा

गाझावर इस्त्राईलने तुफान हल्ला चढवला आहे. भारताने दहशतवाद खपवून घेणार नसल्याचे सांगत इस्त्राईलला जाहीर पाठिंबा दिला. भारत इस्त्राईलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. आतापर्यंत भारत पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल या दोघांसोबत पण उभा होता. पण भारताने ही भूमिका बदलली आहे. दहशतवाद्याला समर्थन देऊ शकत नाही, असे भारताने ठणकावले आहे. विशेष म्हणजे हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही. त्यामुळे एक प्रकारे भारत पॅलेस्टाईनसोबत असला तरी तो हमास सोबत नाही.

हे सुद्धा वाचा

काय घातले साकडे

पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान एमजे अबुअलहायजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी हे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याचे साकडे मोदी यांना घातले आहे. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही मोदी यांचा सन्मान करतात. त्यामुळे त्यांनी जागतिक मंचावर प्रयत्न करावेत. मध्यस्थी करुन त्यांनी हे काही तरी करावे अशी विनंती त्यांनी केली आहे. इस्त्राईलने हमासवरील हल्ल्यानंतर उत्तरी गाझा पट्टीतील 11 लाख लोकांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे.

आतापर्यंत 3200 जणांचा मृत्यू

हमास आणि इस्त्राईल यांच्या युद्धात आतापर्यंत 3200 जणांना प्राणास मुकावे लागले आहे. इस्त्राईलचे 1300 तर पॅलेस्टाईनचे 1900 नागरिक मारल्या गेले आहेत. यामध्ये सैनिकांचा पण समावेश आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ही लढाई इस्त्राईलच संपवेल असा निकाराचा नारा दिला आहे. इस्त्राईलने 3 लाख सैनिक गाझा सीमेवर तैनात केले आहे. हे सैनिक लवकरच गाझा पट्टीत निर्णायक लढाईला सुरुवात होईल.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.