Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा

Israel-Hamas War | मध्य-पूर्वेतीलच नाही तर भारतातील ज्यू नागरिकांवर पण हल्ला होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पण भारतात ज्यू नागरिक आहेत तरी किती? ते प्रामुख्याने कोणत्या शहरात राहतात? त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने काय अलर्ट दिला आहे?

Israel-Hamas War | भारतातील ज्यू नागरिक पण टार्गेटवर? केंद्र सरकारने काय दिला इशारा
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 6:45 PM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हल्ला चढवला. दोन्ही बाजूने सध्या घमासान युद्ध सुरु आहे. जगभरात ज्यू लोक पसरलेले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. अनेक मुस्लीम राष्ट्रात पण ज्यू नागरिकांचे वास्तव्य आहे. भारतात पण ज्यू रहिवाशी आहेत. देशातील काही संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याने केंद्र सरकार अलर्टमोडवर आहे. ज्यू नागरिकांच्या जीवितास कुठलाही धोका होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पण भारतात किती ज्यू नागरिक राहतात माहिती आहे का?

ज्यू नागरिकांच्या वस्तीला संरक्षण

देशातील काही शहरात ज्यू नागरिक राहतात. इस्त्राईलचा दुतावास आहे. त्यांचे अधिकारी, कर्मचारी हे राहत असलेल्या ठिकाणचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. या भागात पोलीसांसह गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी पण लक्ष ठेऊन आहेत. चीनची राजधानी बिजिंगमध्ये शुक्रवारी इस्त्राईल दुतावासातील अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. संभावित हल्ला टाळण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीच्या ठिकाणांना सुरक्षा

मुंबई 26/11 हल्ल्यात ज्यू नागरिकांना पण लक्ष्य करण्यात आले होते. पुण्यातील जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. कोरेगाव पार्कमधील चबड हाऊस पण त्यांच्या हिटलिस्टवर होते. दिल्लीतील काही ठिकाणी ज्यू नागरिक राहतात, या ठिकाणची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळांना पण सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

ज्यूंचे भारताशी जुने संबंध

दोन हजार पूर्वी ज्यू नागरिक भारतात स्थलांतरीत झाले. भारतात दाखल होणार ज्यू हा पहिला परदेशी धर्म आहे. भारतात सध्या 6,000 ज्यू नागरिक आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीतून ते भारतात दाखल झाले होते. त्यांचे महाराष्ट्राशी घट्ट नाते आहे. कोकण आणि मुंबई पट्ट्यात बेने इस्त्राईल यांची संख्या सर्वात जास्त होती. त्यातील काही इस्त्राईलमध्ये गेले. कोलकत्ता भागात बगदादी ज्यू तर उत्तर भारतात बेनेई मिनाशे यांची पण संख्या आहे. त्यांची ओळख इस्त्राईलने डीएनएवरुन केली होती.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.