‘चंद्रयान-2’चं लाँचिंग स्थगित, तांत्रिक अडचणीमुळे इस्रोने 56 मिनिटांपूर्वी लाँचिंग थांबवलं
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ मिशनला प्रक्षेपणापूर्वी तांत्रिक समस्येचं ग्रहण लागलं. प्रक्षेपणापूर्वीच हे मिशन थांबवण्यात आलं. लाँचिंग सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्याने ही निर्णय घेण्यात आला.
श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ मिशनला प्रक्षेपणापूर्वी तांत्रिक समस्येचं ग्रहण लागलं. प्रक्षेपणापूर्वीच हे मिशन थांबवण्यात आलं. लाँचिंग सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्याने ही निर्णय घेण्यात आला. इस्रोने स्वत: हे प्रक्षेपणा थांबवण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच, ‘चंद्रयान-2’च्या प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच घोषित केली जाईल, असंही इस्रोने सांगितलं आहे.
A technical snag was observed in launch vehicle system at 1 hour before the launch. As a measure of abundant precaution, #Chandrayaan2 launch has been called off for today. Revised launch date will be announced later.
— ISRO (@isro) July 14, 2019
15 जुलैलै पहाटे 2.51 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ मिशनचं प्रक्षेपण होणार होतं. मात्र प्रक्षेपणाचं काऊंटडाउन सुरु होण्याच्या 56 मिनिटं 24 सेकंदांपूर्वी हे मिशन थांबवण्यात आलं. कंट्रोल रुमच्या आदेशावरुन रात्री 1.55 वाजता हे प्रक्षेपण थांबवण्यात आलं. ‘चंद्रयान-2’चं प्रक्षेपण पाहाण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील श्रीहरिकोटामध्ये उपस्थित होते.
‘प्रक्षेपणाच्या 1 तासापूर्वी लाँच व्हेईकल सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. त्यामुळे सावधगिरी बाळगत आम्ही आज हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रक्षेपणाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल’, असं इस्रोने सांगितलं.
‘तांत्रिक समस्येमुळे प्रक्षेपण थांबवण्यात आलं. लाँचिंग विंडोच्या आत प्रक्षेपण करणे शक्य नाही. प्रक्षेपणाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल’, असं इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. इस्रोने यापूर्वी जानेवारीमध्ये या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर ती 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली.
चंद्रयान-2च्या प्रक्षेपणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. जर हे मिशन यशस्वी झालं तर भारतासाठी हा एक सूवर्ण दिवस असता. या मिशननंतर भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनेल. मात्र, यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.
आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने ‘चंद्रयान-2’चं प्रक्षेपण होणार होतं. या मिशनसाठी 978 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ‘चंद्रयान-2’ला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 54 दिवस लागणार होते. गेल्या आठवड्यात या मिशनसंबंधी सर्व रिसर्चनंतर रविवारी सकाळी 6.51 मिनिटांनी याचं काऊंटडाउन सुरु झालं होतं.
प्रक्षेपण टळल्याने निराशा झाली असली, तरी वेळीच तांत्रिक समस्या लक्षात आल्याने पुढील परिस्थिती सांभाळनं सोपं झालं आहे, अशी प्रतिक्रिया काही शास्त्रज्ञ आणि जाणकारांनी दिली. तसेच लवकरच या मिशनच्या पुर्नप्रक्षेपणाची तारीख जाहीर होईल अशी आशाही व्यक्त केली.