बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO कडून चांद्रयान-3 मिशनमधून प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर पाठवलं. हा रोव्हर आता चंद्राच्या पुष्ठभागावर आरामात झोपी गेलाय. म्हणजेच प्रज्ञान रोव्हरला आता स्लीप मोडवर टाकण्यात आलय. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला, त्या दिवशी तिथे दिवस होता. आता तिथे रात्र सुरु झालीय. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर जात असताना, इस्रोच्या दुसऱ्या महत्वकांक्षी ‘आदित्य एल 1’ मिशनला सुरुवात झाली आहे. रविवारी आदित्य एल 1 ने पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. म्हणजे कक्षा विस्तार करण्यात आला. आदित्य एल 1 ला पृथ्वीपासून थोडं लांब नेण्यात आलं. आता पाच सप्टेंबरच्या रात्री पुन्हा एकदा आदित्य एल-1 ची कक्षा बदलण्यात येईल. इस्रोच्या या नव्या मिशनबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे.
आदित्य एल 1 ने यशस्वीरित्या कक्षा बदलली, असं इस्रोकडून रविवारी सांगण्यात आलं. सॅटलाइट एकदम व्यवस्थित, सामान्यपणे काम करतय. बंगळुरु येथील इस्रोच्या टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कमधून ही कक्षा बदलाची प्रक्रिया पार पडली. सध्या सूर्ययान 245 किलोमीटर x 22459 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे. आदित्य एल 1 ला शनिवारी श्रीहरिकोटा येथून लॉन्च करण्यात आलं होतं. आदित्य एल 1 एकूण 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार आहे. एकूण पाचवेळा याची ऑर्बिट बदलली जाईल. रविवारी पहिल्यांदा कक्षा विस्तार करण्यात आला. आता पाच सप्टेंबरला दुसऱ्यांदा कक्षा विस्तार होईल. सूर्ययानला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरच अंतर कापाव लागणार आहे. सूर्याच्या बाहेरील वातावरणाचा अभ्यास करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.
Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.Currently, the battery is fully charged.
The solar panel is…— ISRO (@isro) September 2, 2023
रोव्हरचा रिसीव्हर ऑन
दरम्यान चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरला आता स्लीप मोडवर टाकण्यात आलय. पण त्याची बॅट फुल चार्ज आहे. 22 सप्टेंबर 2023 ला चंद्रावर पुन्हा एकदा सूर्योदय होईल. आता तिथे रात्र आहे. पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा 1 दिवस असतो. म्हणूनच रोव्हरचा रिसीव्हर चालू ठेवण्यात आलाय. म्हणजे चंद्रावर पुन्हा दिवस सुरु झाल्यानंतर मिशन सुरु होण्याची अपेक्षा आहे.
तर तो एक चमत्कार
वैज्ञानिकांना आता चंद्रावर दिवस सुरु होण्याची अपेक्षा असेल. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची निर्मिती 14 दिवसांच्या हिशोबाने करण्यात आली होती. चंद्रावर पुन्हा सूर्यप्रकाश आल्यानंतर या उपकरणांनी काम सुरु केलं, तर तो एक चमत्कार ठरेल.