ISRO इस्रोने पुन्हा रचला इतिहास, आता उपग्रहाद्वारे मिळणार हवामानाची अचूक माहिती

इस्रोने शनिवारी हवामानविषयक उपग्रह INSAT-3DS चे प्रक्षेपण केले. श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे हवामानाशी संबंधित माहिती इस्रोला पाठवेल. हवामानाचा अंदाज आणि आपत्तीचा इशारा देण्यासाठी या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे.

ISRO इस्रोने पुन्हा रचला इतिहास, आता उपग्रहाद्वारे मिळणार हवामानाची अचूक माहिती
ISRO MISSION Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 9:26 PM

नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. शनिवारी संध्याकाळी सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथून जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 (GSLV-F14) वर INSAT-3DS हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता याचे काउंटडाऊन सुरू झाले होते. INSAT-3DS हा तिसऱ्या पिढीतील हवामानाचा अंदाज वर्तवणारा उपग्रह यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत ठेवण्यात आला.

मिशनचे उद्दिष्ट काय आहे

प्रगत हवामानविषयक माहिती, हवामान अंदाज, जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे, येणाऱ्या संकटांची सूचना देणे, उपग्रह सहाय्यित संशोधनासाठी विद्यमान उपग्रहांना INSAT-3D आणि INSAT-3DR सतत सेवा देणे हे या उद्दिष्टाने हे उपग्रह बनविण्यात आले आहे. सुमारे 20 मिनिटांच्या उड्डाणानंतर तीन टप्प्यांनंतर INSAT-3DS रॉकेटपासून वेगळे झाले. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/Exposet मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता 2024 मध्ये ISRO ची ही दुसरी मोठी मोहीम आहे.

अंदाजे 10 वर्षे INSAT-3DS चे आयुष्य

भारतीय हवामान विभाग, नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर यासारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या विविध विभाग, संस्था हवामानाचा अंदाज देतात. मात्र, त्यांचे अंदाज अनेकदा चुकतात. अशावेळी INSAT-3DS द्वारे देण्यात येणारी माहिती ही अचूक असेल असा दावा इस्रोने केला आहे. तसेच, INSAT-3DS चे आयुष्य अंदाजे 10 वर्ष असेल अशी माहितीही इस्रोने दिलीय.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी GSLV पुढील NISAR मिशनमध्ये तैनात केले जाईल. यूएस स्पेस एजन्सी आणि NASA यांचा हा एक सहयोगी प्रयत्न आहे. या यशामुळे अंतराळ संस्थेला अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आम्ही इन्सॅट-३डीएस३ मिशन यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे. हा उपग्रह त्याच्या कक्षेत ठेवण्यात आला आहे. त्याची कामगिरी चांगली आहे. या कामात सहभागी असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

इस्रोच्या या यशाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण ही आनंदाची घटना आहे. पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रो अनेक इतिहास रचत आहे. अशा वेळी इस्रोमध्ये सामील होणे ही अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.