नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : इस्रोने चांद्रयान -3 हे मिशन यशस्वी पार पाडलं. त्यानंतर सूर्यावर संशोधन करण्यासाठी सोलार मिशनही सुरू केलं. हे सोलार मिशन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. असं असतानाच आता इस्रोने आणखी एक मिशन हाती घेतलं आहे. या मिशनचं नाव बिकिनी असं आहे. यूरोपातल एका कंपनीचं हे मिशन आहे. या कंपनीचं हे मिशन इस्रोकडून लॉन्च केलं जाणार आहे. त्यामुळे या मिशनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बिकिनी स्पेसक्राप्ट हे यूरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचं री एन्ट्री व्हेईकल आहे. बिकिने हे खऱ्या अर्थाने री एन्ट्री मॉड्यूल निक्सचं छोटं व्हर्जन आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत हे स्पेसक्राफ्ट लॉन्च केलं जाणार आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटमधून लॉन्च केलं जाणार आहे. बिकिनीला हे रॉकेट पृथ्वीपासून 500 किलोमीटर उंचावर नेऊन सोडेल. तिथून परत पृथ्वीवर येईल. यावेळी त्याच्या री एन्ट्रीबाबत अनेक पडताळण्या केल्या जातील. ते वायूमंडळाला पार करून समुद्रात पडेल. बिकिनीचं वजन केवळ 40 किलो आहे. अवकाशात डिलिव्हरी करणं हा त्याचा हेतू आहे.
म्हणजे आपल्या यानाच्या माध्यमातून अवकाशात डिलिव्हरी करण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, असं द एक्स्प्लोरेशन कंपनीला वाटतं. जर हे बिकिनी मिशन जानेवारीत री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झालं तर त्याला कमर्शिअल उड्डान करण्याच्या दुनियेतील दरवाजे उघडे होतील. म्हणजे बिकिनीच्या मार्फत अवकाशात कोणत्याही सामानाची डिलिव्हरी करता येणार आहे. तीही स्वस्तात.
सुरुवातीला हे मिशन यूरोपियन एरियनस्पेसला दिलं जाणार होतं. नंतर भारताच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने हे मिशन मिळवलं. कारण एरियन 6 रॉकेटच्या डेव्हल्पमेंटमध्ये उशीर होत होता. आता बिकिनीला पीएसएलव्ही रॉकेटच्या चौथ्या स्टेजवर लावलं जाईल. त्यानंतर ते अवकाशात सोडलं जाईल. तिथून नंतर बिकिनी परत येईल.
या मिशन दरम्यान द एक्स्प्लोरेशन कंपनीला जो डेटा मिळणार आहे, त्याचा भविष्यात री एन्ट्री आणि रिकव्हरी टेक्नॉलॉजीमध्ये विकसित केला जाणार आहे. पीएसएलव्ही रॉकेट पीएस-4 म्हणजे चौथ्या स्टेजचा वापर नुकताच पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) साठी वापरला जाणार आहे.
POEM म्हणजे पीएस4 पृथ्वीच्या चारही बाजूला प्रदक्षिणा घालून एक्सपेरिमेंट करतो. बिकिनीला पीएस4ला लावलं जाईल. म्हणजे मुख्य मिशनवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण बिकिनीत कोणत्यारही प्रकारचं प्रोप्लशन सिस्टिम लावलेली नाही. बिकिनी पीएस4च्या सहाय्यानेच अंतराळात थोडाकाळ राहील. त्यानंतर योग्य उंचीवर गेल्यावर बिकिनी पीएस4 पासून वेगळे होईल. आणि बिकिनी वेगाने वायूमंडळ पार करून समुद्रात जाऊन पडेल.