ISRO सॅटेलाईट NaVIC ची रेंज वाढविणार, चीन आणि पाकिस्तानला धक्का
भारतने एक क्षेत्रीय नेव्हीगेशन उपग्रह प्रणाली स्थापित केली आहे. यास इंडीयन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम म्हणजेच NaVIC नाव दिले आहे.
मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 सारख्या मोहीमांमुळे चर्चेत असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आता नवीन मिशनच्या मागे लागला आहे. ही मोहीम आगामी अंतराळ मोहिम गगनयान आणि शुक्रयान पेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. यामुळे भारताला खूप फायदा होणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेच्या आतपर्यंत भारताला टेहळणी करता येणार आहे. सॅटेलाईट NaVIC ची क्षमता वाढविणार आहे. नाविकची क्षमता वाढवून दुप्पट करण्याची योजना आहे.
CSIR च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात इस्रोच्या आगामी मोहिमांची माहीती दिली. सोमनाथ यांनी सांगितले की भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संशोधक नाविकची नेव्हीगेशन कव्हरेज वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची सध्याची रेंज भारताबाहेर 1500 किमीपर्यंत आहे. तिला वाढवून आता दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. असे केल्याने सार्क देश भारताच्या रेंजमध्ये येतील. चीनचाही महत्वाचा भाग आपल्या रेंजमध्ये येणार आहे.
सैन्याची ताकद वाढणार आणि हा फायदा
भारतने एक क्षेत्रीय नेव्हीगेशन उपग्रह प्रणाली स्थापित केली आहे. यास इंडीयन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम म्हणजेच NaVIC नाव दिले आहे. याला भारताच्या पहिला भारतीय क्षेत्रीय नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टम ( IRNSS ) असे ओळखले जाते. या ग्राऊंड स्टेशनशी जोडलेले असते. या प्रणालीत सात सॅटेलाईट आहेत. यातील तीन सॅटेलाईल जियो स्टेशनरी ऑर्बिटमध्ये आहेत. तर उर्वरित चार जियोसिंक्रोनिस ऑर्बिटमध्ये आहेत. सध्या संपूर्ण देशावर नजर ठेवण्याबरोबरच भारताच्या सीमेबाहेर 1500 किमी क्षेत्रात टेहळणी होते. या प्रणालीमुळे स्टँडर्ड पोझिशन सर्व्हीसचा पत्ता कळतो. दुसरी श्रेणी गुप्त ठेवली जाते जी केवळ सशस्र दल आणि सुरक्षा एजन्सी रणनीतीसाठी वापरतात. त्यास RS म्हणजे प्रतिबंधित सेवा म्हटले जाते.
क्षेत्रीय नेव्हीगेशन सिस्टीम दोन देशांकडेच
NaVIC प्रणालीची रेंज वाढल्याने शेजारील देशात टेहळणीची रेंज 1500 ते 3000 किमीपर्यंत वाढेल. मिसाईल नेव्हीगेशनसाठी वापर होईल. घुसखोरी रोखता येईल. समुद्रावर लक्ष ठेवता येईल. नैसर्गिक संकटाची पूर्व माहीती मिळेल. सध्या चार देशांकडे ग्लोबल सिस्टीम आहे. यात अमेरिकेकडे जीपीएस, रशियाकडे GLONASS, युरोपीय संघाची गॅलिलियो आणि चीनची बीडूल आहे. तर केवळ दोन देशात स्वत:ची क्षेत्रीय नेव्हीगेशन सिस्टीम आहे. यात एक जपानची QZSS आणि भारताची NaVIC आहे. ज्याची रेंज वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.