Chandrayaan-3 update : युट्यूबवर चंद्रयान-3 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगने तोडले सर्व रेकॉर्ड, जगात सर्वाधिक पाहीलेला लाईव्ह इव्हेंट ठरला
इस्रोच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा भारत पहिला देश झालाच परंतू इस्रोच्या युट्यूब चॅनलनेही नवा जागतिक विक्रम केला आहे.
नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : भारताच्या चंद्रयान-3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग करीत नवा इतिहास रचला. चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश बनला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा पहीला देश बनला. दुसरीकडे इस्रोच्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकने देखील युट्यूबवर नवा इतिहास रचला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून जेथे कुठे भारतीय राहातात तेथून त्यांनी हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला असल्याने इस्रोचे चंद्रयान-3 लॅंडींग लाईव्ह स्ट्रीमिंग 8.06 दशलक्ष ( 80 लाख ) लोकांनी पाहिल्याने युट्यूबच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड ध्वस्त झाले आहेत.
आतापर्यंत युट्यूबवर ब्राझील विरुध्दचा द.कोरीयाची फुटबॉल मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग सर्वाधिक 6.15 दशलक्ष लोकांनी एकाच वेळी जगभरात पाहीले गेले होते. हा रेकॉर्ड चंद्रयान-3 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगने मोडून टाकला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील विरुद्ध क्रोएशियाची फुटबॉल मॅच असून तिला 5.2 दशलक्ष लोकांनी एकाच वेळी पाहीले होते.
सबस्क्राईबहून अधिक दर्शक
इस्रोच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर चंद्रयान-3 ची लॅंडींगच्या आधीची सबस्क्राईबची संख्या 2.68 दशलक्ष म्हणजेच 26 लाख होती. चंद्रयान-3 लॅंडींगनंतर ती 35 लाख झाली आहे. लाईव्ह प्रसारण सुमारे एक तास 11 मिनिटे चालले. या एक तासांत इस्रोचे नऊ लाख सबस्क्राईब वाढले. इस्रोच्या लाईव्ह प्रसारणाला सबस्क्राईबच्या तीन पट जादा लोकांनी जगभरातून एकसाथ पाहीले.
असे वाढले सब्सक्राईबर्स
– इस्रोच्या युट्यूब चॅनलचे 2.68 मिलीयन सब्सक्राईबर्स आहेत. परंतू नऊ मिनिटातच चंद्रयान-3 चे लाईव्ह लॅंडींग पाहण्यासाठी चॅनलवर 2.9 दशलक्ष लोक जोडले गेले.
– 13 मिनिटातच 3.3 मिलियन लोक लाईव्ह प्रसारण पाहू लागले.
– 17 व्या मिनिटात सुमारे 40 लाख लोक लाईव्ह प्रसारणात जोडले गेले
– 31 मिनिटानंतर इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर 5.3 मिलियन म्हणजेच 53 लाख लोक जोडले गेले.
– 45 मिनिटांनंतर 66 लाख लोक लाईव्ह प्रसारण पाहू लागले. त्यानंतर दर्शकसंख्या 80 लाखाच्या आसपास पोहचली.
यूट्यूबवर आतापर्यंत सर्वात पाहीलेले लाईव्ह स्ट्रीमींग
1 – इस्रो चंद्रयान-3 : 8.06 मिलीयन ( 80 लाख )
2 – ब्राजील विरुध्द दक्षिण कोरिया: 6.15 मिलीयन
3 – ब्राजील विरुध्द क्रोएशिया: 5.2 मिलीयन
4 – वास्को विरुध्द फ्लेमेंगो: 4.8 मिलीयन
5 – स्पेसएक्स क्रू डेमो: 4.08 मिलीयन
6 – बीटीएस मक्खन : 3.75 मिलीयन
7 – सेब : 3.69 मिलीयन
8 – जॉनी डेप विरुध्द एम्बर : 3.55 मिलीयन
9 – फ्लुमिनेंस विरुध्द फ्लेमेंगो : 3.53 मिलीयन
10 – कैरिओका चॅम्पियन, फायनल : 3.25 मिलीयन