तूफानी वाऱ्यातही RLV पुष्पकची हॅटट्रीक लॅण्डींग, अखेर काय आहे या विमानाचे वैशिष्ट्ये
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO ) रियुजेबल लॉंच व्हेईकल पुष्पक आज कर्नाटकातील चित्रदुर्गा या एअरोनॉटीकल टेस्ट रेंज येथून करण्यात आली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO च्या पुनर्वापर करया येणाऱ्या रीयुजेबल लॉंच व्हेईकल एलईएक्स – 03 ( ) ‘पुष्पक’ चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडींग झाले आहे. पुष्पक विमानाने तूफान वाऱ्यातही यशस्वीपणे लँडींग केले आहे. इस्रोने आरएलव्ही-ओआरव्ही, ऑर्बिटल रियुजेबल व्हेईकलमध्ये सामील झाले आहे. या मोहीमेमुळे भारताला अंतराळात मानव पाठविण्याच्या लक्ष्य लवकरच पूर्ण करता येणार आहे.
पुष्पक विमानाची चाचणी सकाळी 7.10 वाजता कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील एअरोनॉटीकल टेस्ट रेंज मध्ये करण्यात आले. आधी पुष्पक ALV LEX – 01 आणि LEX-02 च्या यशस्वी चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता अधिक आव्हानात्मक परिस्थिती जोरदार वाऱ्यामध्ये या तिसऱ्या पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले.
पुष्पक विमानाला भारतीय वायू दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे आकाशात 4.5 अंतरावर नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर पुष्पक विमान स्वयंचलितपणे क्रॉस रेंज करेक्शन केले. रनवे पासून 4.5 किमी अंतरावर हा रिलीज पॉईंट होता.
इस्रोची एक्स पोस्ट येथे पाहा –
Hat-trick for ISRO in RLV LEX! 🚀
🇮🇳ISRO achieved its third and final consecutive success in the Reusable Launch Vehicle (RLV) Landing EXperiment (LEX) on June 23, 2024.
“Pushpak” executed a precise horizontal landing, showcasing advanced autonomous capabilities under… pic.twitter.com/cGMrw6mmyH
— ISRO (@isro) June 23, 2024
पुष्पकची लॅंडींग अशी झाली
पुष्पक रनवे जवळ पोहचले आणि सेंटर लाईनवर त्याने होरिझोंटल लँडींग केली, पुष्पकच्या लिफ्ट -टू-ड्रॅगमध्ये कमतरता असल्याने लँडींग ( वेग ) वेलोसिटी 320 किमी प्रति तासाहून अधिक झाली होता. एका व्यावसायिक विमानाला 260 किमी प्रति तास आणि एक सामान्य लढाऊ विमानाला 280 किमी प्रति तास लॅंडींगचा असणाऱ्या वेगापेक्षा हा वेग जादा होता. रियुजेबल लॉंच व्हेईकल लॅंडींग करण्याचा उद्देश्य रॉकेट बूस्टरला रिकव्हर करणे हा आहे. जो एक स्पेसक्राफ्टला लॉंच करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे इंधन भरल्यानंतर या पुष्पक विमानाचा पुनर्वापर केला जाणार आहे. ISRO ला रियुजेबल लॉंच व्हेईकल ( RLV ) स्पेस एक्सवरुन स्वतंत्रपणे लॉंच करण्यात येणार आहे. हे लॉंच व्हेईकल पृथ्वीच्या खालच्या कक्षेत दहा हजार किलोमीटरहून अधिक वजन घेऊन जाण्यास सक्षम आहे.