सीमा हैदर हीने भारतीय दिसण्यासाठी केला खास मेकअप, बॉर्डर क्रॉस करण्यासाठी वापरली ही अजब ट्रीक, आयबीचे सनसनाटी दावे
सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीचीच चर्चा सुरु आहे. भारतात प्रवेश करण्यास सीमाला नक्की कोणी मदत केली. तिच्या सोबत मुलांनाही भारतात प्रवेश कसा मिळाला ? याचा तपास यंत्रणा सुरु आहे.
नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : पाकिस्तानवरुन चार मुलांसह भारतातल्या प्रियकराला भेटण्यासाठी आपले सर्व घरदार सोडून आलेल्या सीमा हैदर ( Seema Haider And Sachin ) हीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे होत आहेत. ही सीमा नेपाळवरुन भारतात शिरताना तिला कोणीतरी त्रयस्ताने मदत केल्याचा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे. सीमाने भारतीय दिसण्यासाठी भाषेपासून पेहरावावर जास्तच मेहनत घेऊन बॉर्डर क्रॉस केल्याचा संशय असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीचीच चर्चा सुरु आहे. सीमा आपल्या नवऱ्या सोडून चार मुलांसह भारतात आल्याने ही प्रेमकहाणी चवीने चर्चिली जात आहे. परंतू तिची एटीएस आणि आयबीद्वारे केलेल्या चौकशीत वेगळीच माहीती समोर येत आहे. नेपाळ मार्गे भारतात दोनदा आलेल्या सीमाचे गौंडबंगाल काही कळण्यापलिकडे आहे.
भारतीय तपास यंत्रणांनी अशा मनुष्य तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध सुरु केला आहे. भारतात अनधिकृतरित्या प्रवेश करण्यास सीमाला नक्की कोणत्या टोळीने मदत केली. मनुष्य तस्करी ह्युमन ट्रॅफीकींग किंवा देह व्यापारात वापरतात तशी ट्रीक तिने नेपाळमार्गे भारतात येताना वापरली का ? यासाठी कोणी त्रयस्त व्यक्तीने तिला मदत केली का ? याचा शोध सुरु आहे.
13 मे रोजी भारत- नेपाळ सीमेवरील सुनौली सेक्टर आणि सीतामढी सेक्टर मध्ये तिसऱ्या देशाच्या नागरिकाच्या उपस्थिती संबंधी अद्याप कोणतीच माहीती मिळू शकलेली नाही. दोघांचे दावे पडताळून पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यातही आले आहेत. भारत-नेपाळ सीमेवरील बस मार्गावरील बसेसचे सीसीटीव्ही देखील तपासण्यात येत आहेत. भारत-नेपाळ मैत्री करारानूसार जर तिसऱ्या देशाचा नागरिक जर येथे सीमाप्रवेश करीत असेल तर याची माहिती तातडीने संबंधीत एजन्सीने स्थानिक पोलिसांना बंधनकारक आहे.
दहा प्रश्नांची उत्तरे संशयास्पद आहेत..
1) चार मुलांची आई स्वत:ला पाकिस्तानातील छोट्या शहरातील असल्याचे सांगते. परंतू एका खेड्यातील चार मुलांची आईला दिवसभर पब्जी खेळायला वेळ कसा मिळाला.
2) पाचवी पास मध्यमवर्गीय गृहीणीकडे दोन-दोन पासपोर्ट कसे ?
3) आपल्या चार मुलांना सोडून एक आई सचिनला भेटायाला नेपाळला कशी आली.
4) पाकिस्तानला गेल्यावर तिने आपल्या चार मुलांचे नवे पासपोर्ट कसे काय बनविले
5) एवढे पैसे तिच्याकडे आले कसे? सीमाच्या दाव्याप्रमाणे तिने घर विकले. पण पाकिस्तानात महिलांना एवढा अधिकार आहे.?
6) पतीला न कळताच तिने घर कसे काय विकले
7) सीमाने दुबई जाऊन पाक रुपयाला रिदहम मध्ये कसे बदलवले दुबईत हॉटेल आणि कॅबचा खर्च कसा केला.
8) घुसखोरीच्या आरोपात अटक होऊनही ती एवढी शांत कशी काय ?
9) सीमाने आपल्या आणि आपल्या चार मुलांचा बोगस आधारकार्ड कसे बनविले?
10 ) पाकिस्तानातून जे फोन वापरले ते तिने येथे आणले नाही. नेपाळहून देखील दुसऱ्या लोकांच्या फोनद्वारे तिने व्हॉट्सअप कॉल केले, पाकिस्तानात आपला पर्सनल लॅपटॉप सोडून कशी आली.