Women Security | बारमध्ये जाण्यापेक्षा घरीच बिअर घेणं सुरक्षित, बाहेरचं वातावरण महिलांना का नकोसं? नव्या संशोधनाचा अहवाल काय सांगतोय?

महिलांमध्ये मद्यपान करण्यची इच्छा आहे पण बाहेर होणारी गैरसोय आणि इतर समस्यांचा त्यांना अडसर होत असल्याचे मत एनएफएक्स डिजिटल मालक व्ही.पी अमितेश यांनी सांगितले आहे. शिवाय महिला शॉपमध्ये जाऊन दारु खरेदी करण्याचेही टाळतात कारण त्यांना भीती असते ती अधिकाऱ्यांकडून पकडलो गेलो तर याची. एवढेच नाहीतर वाईन शॉपमधील गर्दी, माणसांची वर्तवणूक ही व्यवस्थित असेलच असे नाही अधिकतर महिला ह्या मॉल्समधील दारूच्या दुकानांमधून मद्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

Women Security | बारमध्ये जाण्यापेक्षा घरीच बिअर घेणं सुरक्षित, बाहेरचं वातावरण महिलांना का नकोसं? नव्या संशोधनाचा अहवाल काय सांगतोय?
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 1:51 PM

मुंबई : अजून तरी महिला बारमध्ये दारु घेताना दिसत नाहीत. याचा अर्थ महिला (Wine) दारुच घेत नाहीत असा होत नाही. सार्वजनिक ठिकाणी दारु घेण्यासाठी त्यांना सुरक्षततेबद्दल चिंता वाटते त्यामुळे 45 टक्के महिला ह्या घरीच दारु पिणे पसंत करातात. कंतार NFX च्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले असून या संदर्भात ‘रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग अँड कन्झ्युमर बिहेवियर’ या विषयावरील अभ्यासात म्हटले आहे की, दुकाने आणि बारमध्ये असुरक्षित दारूविक्रीमुळे स्त्रिया घरीच मद्यपान करणे पसंत करतात.  (Drinking alcohol) मद्यपानामध्ये महिलांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असला तरी बाहेरील खराब वातावरण आणि त्यांना (Women’s Safety) असुरक्षित वाटत असल्याने वाईनशॉपमधून दारु खरेदी करुन घरीच घेणे पसंत करतात. दारु खरेदी करीत असताना पुरुषांसोबत महिला असतात हे देखील या अभ्यासावरुन समोर आले आहे.

दारु पिण्याची इच्छा पण…

महिलांमध्ये मद्यपान करण्यची इच्छा आहे पण बाहेर होणारी गैरसोय आणि इतर समस्यांचा त्यांना अडसर होत असल्याचे मत एनएफएक्स डिजिटल मालक व्ही.पी अमितेश यांनी सांगितले आहे. शिवाय महिला शॉपमध्ये जाऊन दारु खरेदी करण्याचेही टाळतात कारण त्यांना भीती असते ती अधिकाऱ्यांकडून पकडलो गेलो तर याची. एवढेच नाहीतर वाईन शॉपमधील गर्दी, माणसांची वर्तवणूक ही व्यवस्थित असेलच असे नाही अधिकतर महिला ह्या मॉल्समधील दारूच्या दुकानांमधून मद्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आऊट ऑफ द ब्लूचे संचालक आणि संकल्पनाकार राहुल बजाज म्हणाले की, भारतातील प्रत्येक राज्यात मद्यपान करण्याचे कायदेशीर वय वेगवेगळे असल्याने त्यामुळे निर्बंध निर्माण होतात.

कायद्याच्याही अडचणी

केवळ सामाजिक बंधनच नाहीतर कायदेशीर अडचणी आणि वयाच्या अटी यामुळेही भारतीय महिला ह्या रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करीत नसल्याचे आऊट ऑफ द ब्लूचे संचालक आणि संकल्पनाकार राहुल बजाज यांनी सांगितले आहे. दारू खरेदी करण्यासाठी पोषक वातावरण तयार केले गेले आणि आधुनिक रिटेलची घनता वाढली तर महिलांना दारू खरेदी करण्याचे बळ मिळेल, असे बजाज यांनी सांगितले.

दारु खरेदीची पध्दत बदलली तर टक्का वाढेल

काळाच्या ओघात महिलाराज वाढत असले तरी ते काही मर्यादित क्षेत्रापुरतेच आहे. महिला आजही त्यांच्या अनेक बाबींमध्ये सुरक्षितता ठेवतात शिवाय सावधगिरीही बाळगतात. मग ते सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना असो की आणखी काही. सुरक्षततेसाठी शहर चांगले असले तरी वाईन शॉप्समध्ये जाण्यापेक्षा त्याची ऑर्डर करणेही केव्हाही महिलांसाठी चांगलेच असे बार किचनच्या सह-संस्थापक प्रियांका शर्मा यांनी सांगितले आहे. खरेदी पध्दतीमध्ये बदल झाला तर दारुविक्रीवरही त्याचा परिणाम होईल असेही त्यांनी सांगितले आहे. ऑनलाइन आणि होम डिलिव्हरी देखील महिलांना स्वतःहून दारू खरेदी करण्यास मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील असेही त्या म्हणाल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.