ममता बॅनर्जींचं सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक, जे.पी. नड्डांचं टीकास्त्र
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. J P Nadda Mamata Banerjee
कोलकाता: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. ते पश्चिम बंगालमध्ये काढण्यात आलेल्या दुसऱ्या परिवर्तन यात्रेत बोलत होते. तारापीठ येथील सभेला संबोधित करताना नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांचं नेतृत्त बंगालच्या संस्कृतीला धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व बंगालला विकासाकडे घेऊन जाऊ शकत नाहीत, असा आरोप नड्डा यांनी केला. (J P Nadda attack on Mamata Banerjee said bhaeepo has tarnished culture of Bengal)
भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. जे.पी.नड्डा यावेळी बोलताना म्हणाले, “ममताजी खूप झालं, राज्यातील जनतेला परिवर्तन पाहिजे. ममताजींना पश्चिम बंगालचा विकास नकोय”. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल,आम्ही मोकळ्या हातानं येत नाही, प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4700 कोटींचे प्रकल्प आणले. ममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.
हम लोग बंगाल में भाजपा की परिवर्तन यात्राओं की शुरुआत करेंगे।
ये यात्राएं हम सभी को विकास की ओर ले जाने के लिए प्रेरित करते हुए जनता को जोड़ने का काम करेगी।
– श्री @JPNadda #PoribortonYatra pic.twitter.com/S654eF42za
— BJP (@BJP4India) February 9, 2021
भाईपोनं बंगालच्या संस्कृतीला कलंकित केले
जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जीचा पुतण्या अभिषेक बॅनर्जींवर निशाणा साधला. त्यांनी बंगालच्या संस्कृतीला कलंकित केलं आहे. अभिषेक बॅनर्जींना टीका करायची होती, तर त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर करायला पाहिजे होती. त्यांनी त्याऐवजी त्यांच्या वडिलांवर टीका करताना जी भाषा वापरली गेली. ती बंगालच्या संस्कृतीला धरुन नव्हती. बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडलीय, लोकांना आरोग्य सेवा मिळत नाहीत, असा आरोप नड्डा यांनी केला.
जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील तारापीठ येते तारा मंदिरात पूजा अर्चा केली. परिवर्तन यात्रेचा उद्देश पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करणे हा, असल्याचं जे.पी. नड्डा म्हणाले.
पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोपhttps://t.co/C1FgbPA2wf#JPNadda #WestBengal #BJP #TMC @JPNadda
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2020
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप
PHOTO | नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप टीएमसीचं गुंडाराज संपवून सत्तेत येणार: नड्डा
(J P Nadda attack on Mamata Banerjee said bhaeepo has tarnished culture of Bengal)