प. बंगालमध्ये आम्ही 200 हून अधिक जागा जिंकू; जेपी नड्डा यांचा दावा

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात भाजपने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभेचे आयोजन केले होते.

प. बंगालमध्ये आम्ही 200 हून अधिक जागा जिंकू; जेपी नड्डा यांचा दावा
जे.पी. नड्डा भाजप अध्यक्ष
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 11:33 PM

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) हे सध्या पश्चिम बंगालच्या (west bengal) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात भारतीय जनता पक्षाने पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना नड्डा म्हणाले की, आम्ही (भाजप) इंदिरा गांधींविरुद्धची लढाई जिंकली आहे. आता आपल्यासमोर केवळ ममता बॅनर्जी आहेत. त्यामुळे आम्ही यावेळी बंगालमध्ये विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहोत. (J P Nadda says we will win more than 200 seats in west bengal)

नड्डा म्हणाले की, ममता यांनी बंगालमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केलं आहे. त्यामुळे बंगालचे नागरिक आता ममता बॅनर्जींना रामराम करणार आहेत. आता नमस्कार नाही तिरस्कार मिळेल. दरम्यान डायमंड हार्बरकडे जात असताना जेपी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. हा हल्ला तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. (Clash Between BJP And TMC).

नड्डा म्हणाले, ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा काय असते हे ठाऊक नाही? पदाचा मान राखणे त्यांना माहित नाही. त्यांना बंगलला काय बनवायचं आहे? बंगाल कसा बनवायचा आहे हे आपण ठरवायला हवं. हा बंगाल रवींद्रनाथ टागोरांचा बंगाल असेल की ममता बॅनर्जींचा? त्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत नड्डा म्हणाले की, अशी हजारो कृत्य तुम्ही केली तरी आम्ही त्यावर मात करु. 50 मोटारसायकली गायब केल्यात, कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे, आम्ही त्यावरही मात करु. आमचा एक-एक कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे. बंगालच्या भूमीत क्रांतीकारक जन्माला आले आहेत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत.

जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते. यावेळी जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषचा आरोप आहे की टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. सुरक्षा यंत्रणांनी जेपी नड्डा याच्या ताफ्याला सुरक्षित बाहेर काढलं.

सुरक्षा असतानाही हल्ला झालाच कसा?: ममता

नड्डा यांच्यावरील हल्ला ही नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असताना नड्डा यांच्यावर हल्ला होईलच कसा? असा सवाल करतानाच या हल्ल्याचे व्हिडीओ भाजपने तयार केलेच कसे? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपच्या रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना रॅलीमध्ये खेचून आणण्यासाठीच हल्ल्याची योजना केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Home Minister Amit Shah Orders Probe Into Attack On BJP Chief’s Convoy In Bengal)

संबंधित बातम्या

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; राज्यपालांकडून मागवला रिपोर्ट

(J P Nadda says we will win more than 200 seats in west bengal)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.