टीसीला नडला पब्लिकने फोडला, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रवासी तिकीट चेकरला कानाखाली लगावतो. त्यानंतर हा वाद इतका वाढतो की त्या युवकाला अन्य प्रवासी लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टीसीला नडला पब्लिकने फोडला, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 10:06 PM

भोपाळ :  मध्यप्रदेशमधील जबलपूर या रेल्वे स्टेशनवर तिकीट चेकर आणि एका प्रवाशामध्ये चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळालं. हा वाद इतका टोकाला जातो की त्याचं हाणामारी मध्ये रूपांतर होतं. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तिकीट चेकर तिकीट चेकिंग करत असतानाच त्याचं एका प्रवाशासोबत भांडण होतं, त्यावेळी तो प्रवासी तिकीट चेकरला कानाखाली लगावतो. त्यानंतर हा वाद इतका वाढतो की त्या युवकाला अन्य प्रवासी लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, आमचं म्हणणं आहे की या प्रकाराबाबत अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाहीये. तर कोणी याबाबत तक्रार दाखल केली तर आम्ही कारवाई करू. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. पण याचा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकावर तिकीट चेकर आणि एका प्रवाशामध्ये काही कारणावरून बोलणं सुरू असतं. त्यावेळी त्यांचं बोलणं इतकं टोकाला जातं की त्याचं हाणामारीत रूपांतर होतं. प्रवासी तिकीट चेकरला  कानाखाली मारतो त्यामुळे तिकीट चेक कर खाली कोसळतो. त्यानंतर तिकीट चेकर सोबत असलेले अन्य व्यक्ती त्या युवकाला बेदम मारहाण करतात.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी म्हटलं आहे की, या व्हिडिओ मधील युवकानं आणि तिकीट चेकरणे याबाबत कोणतीही तक्रार केली नाहीये. त्यामुळे तक्रार केल्याशिवाय आम्ही यावर कोणती कारवाई करू शकत नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.