भोपाळ : मध्यप्रदेशमधील जबलपूर या रेल्वे स्टेशनवर तिकीट चेकर आणि एका प्रवाशामध्ये चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळालं. हा वाद इतका टोकाला जातो की त्याचं हाणामारी मध्ये रूपांतर होतं. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तिकीट चेकर तिकीट चेकिंग करत असतानाच त्याचं एका प्रवाशासोबत भांडण होतं, त्यावेळी तो प्रवासी तिकीट चेकरला कानाखाली लगावतो. त्यानंतर हा वाद इतका वाढतो की त्या युवकाला अन्य प्रवासी लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, आमचं म्हणणं आहे की या प्रकाराबाबत अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाहीये. तर कोणी याबाबत तक्रार दाखल केली तर आम्ही कारवाई करू. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. पण याचा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#Watch: मध्य प्रदेश के जबलपुर स्टेशन पर टिकट चेकिंग के दौरान युवक ने TC को थप्पड़ मार दिया जिसके बाद वहां मौजूद लोगों ने युवक की जमकर पिटाई की। घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। #MadhyaPradesh #Jabalpur pic.twitter.com/erexpAVBwz
— Hindustan (@Live_Hindustan) December 31, 2023
या व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकावर तिकीट चेकर आणि एका प्रवाशामध्ये काही कारणावरून बोलणं सुरू असतं. त्यावेळी त्यांचं बोलणं इतकं टोकाला जातं की त्याचं हाणामारीत रूपांतर होतं. प्रवासी तिकीट चेकरला कानाखाली मारतो त्यामुळे तिकीट चेक कर खाली कोसळतो. त्यानंतर तिकीट चेकर सोबत असलेले अन्य व्यक्ती त्या युवकाला बेदम मारहाण करतात.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी म्हटलं आहे की, या व्हिडिओ मधील युवकानं आणि तिकीट चेकरणे याबाबत कोणतीही तक्रार केली नाहीये. त्यामुळे तक्रार केल्याशिवाय आम्ही यावर कोणती कारवाई करू शकत नाही.