जैसलमेर : पाकिस्तानातून आलेल्या हिंदू विस्थापितांच्या घरांवर कारवाई केल्यामुळे प्रसिद्ध आयएएस अधिकारी टीना डाबी या ट्रोल झाल्या होत्या. जैसलमेरच्या अमरसागर केचमेंट एरियामधून हिंदू विस्थापितांना हटवण्यात आलं होतं. आता जिल्हा प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसानासाठी जमिनीची निवड केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून 5 किलोमीटर दूर अंतरावर मूलसागरजवळ 20 एकर जमिनीवर पाकिस्तानी हिंदू विस्थापितांच पूनर्वसन करण्यात येणार आहे.
जागा निश्चित झाल्यानंतर सोमवार संध्याकाळपासून इथे जमीन समतल करण्याच काम सुरु झालं आहे. काम सुरु करण्याआधी इथे भूमिपूजन झालं. इथे जवळपास 200 कुटुंबांच्या निवासाची व्यवस्था करणार येणार आहे.
टीना डाबी यांचे आभार
जमिनीची निवड झाल्यापासून पाकिस्तानी विस्थापितांमध्ये आनंदाची भावना आहे. विस्थापित हिंदुंनी परस्परांना मिठाई भरवली व कलेक्टर टीना डाबी यांचे आभार मानले. मंगळवारी सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिन्दू सिंह सोढा यांनी, त्या स्थानाला भेट दिली व अमरसागर येथून आलेल्या पाकिस्तानी हिंदू विस्थापितांशी चर्चा केली.
टीना डाबी यांचे काय आदेश होते?
जैसलमेरच्या अमरसागर गावात 16 मे रोजी सरकारी भूमीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं. प्रशासनाने आता त्यांना 20 हेक्टर जमीन दिली आहे. नगर विकास न्यासाने मूलसागर गावातील जमीन पाकिस्तानातून आलेल्या हिंदू शरणार्थिंना दाखवली. त्यांना ही जागा पसंत पडल्यानंतर सर्वांना इथेच वसवण्याचा निर्णय घेतला. कलेक्टर टीना डाबी यांनी पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंसाठी जागा निश्चित करुन त्यांना तिथे स्थापित करण्याचे निर्देश दिले होते.