पंतप्रधान नरेंद्र मोदी जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर? NIAचा मोठा गौप्यस्फोट

मोदींच्या जम्मू काश्मीर दौऱ्यादरम्यान झालेल्या चकमकीबाबत NIAकडून खळबळजनक खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर? NIAचा मोठा गौप्यस्फोट
नरेंद्र मोदी, पंतप्रधानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 10:35 AM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : NIAने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केलाय. एप्रिल महिन्यात झालेल्या या दौऱ्याला जैश-ए-मोहम्मदने (JeM) टार्गेट केलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट एनआयएने (NIA) केलाय. जैशचा म्होरक्या मसूद अजहर यानेच हा कट रचला होता, असंही एनआयएने म्हटलं आहे. त्यामुळे जैशच्या हिटलिस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळतंय.

याच वर्षी एप्रिल महिन्यात मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या चकमकीबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते.

मोदींच्या दौऱ्याच्या 48 तास आधी म्हणजे 21 आणि 22 एप्रिलच्या दरम्यान अतिरेकी आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आलं होतं. तर एक जवान शहीद झाला होता. तर 4 जवान जखमी झालेले.

हे सुद्धा वाचा

या चकमकीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 12 अतिरेक्यांविरोधात हे आरोपपत्र तयार करण्यात आलंय. जम्मूत झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये एका चक्रव्युहाचा उल्लेख करण्यात आला आहे.

हा कट खुद्द मसूद अजहर यानेच रचला होता, अशीही माहिती समोर येतेय. मोदींच्या रॅलीआधी जैशच्या 6 अतिरेक्यांनी जम्मूमध्ये सीआयएसएफच्या बसवर हल्ला चढवला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोघा अतिरेर्यांचा खात्मा करण्यात आला होता.

मोदींच्या होणाऱ्या रॅलीवरही अतिरेक्यांचा निशाणा होता. या अतिरेक्यांनी रॅलीत सहभागी होणाऱ्या संरपंचांसह पंचांवरही हल्ला करण्याचा कट आखला होता. तसं प्लॅनिंगही करण्यात आलं होतं. ही रॅली होऊच नये, यासाठी हा कट रचला गेला होता, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिसांनी केला होता. त्यानंतर त्याचा अहवाल हा एनआयएकडे सोपवला होता.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.