Jammu-Kashmir: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मिरमध्ये तणाव; बांदिपोरामध्ये बिहारच्या मजुराची दहशतवाद्यांकडून हत्या
दहशतवाद्यांच्या हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले की, मध्यरात्री बांदीपोरा येथील सोडनारा संबळमध्ये दहशतवाद्यांकडून एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत अमरेज हा बिहारमधील मधेपुरातील बेसराह भागातील रहिवासी होता.
नवी दिल्लीः स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून कारवाया (terrorist Attack) वाढल्या आहेत. गुरुवारी केंद्रशासित प्रदेशातील राजौरी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले होते, त्याचवेळी सुरक्षा दलांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यावेळी घाटीत टार्गेट किलिंगची आणखी एक घटना घडत असतानाच दहशतवाद्यांकडून एका स्थलांतरित बिहारच्या मजुराची हत्या (Migrant Bihar Laborer Killed) करण्यात आली आहे. या वर्षात आतापर्यंत दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये 26 जणांना ठार करण्यात आले आहे. या मृत झालेल्यांमध्ये 7 पोलीस आणि 10 नागरिकांचा समावेश आहे. या हत्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांमध्ये एक काश्मिरी पंडित कर्मचारी, एक स्थानिक राजपूत हिंदू आणि जम्मू प्रदेशातील दोन बिगर-मुस्लिमांता समावेश आहे.
Around 12.20 am my brother woke me up & said that a firing has started. He (deceased) wasn’t around, we thought he went to toilet. We went to check, saw him lying in a pool of blood & contacted security personnel. He was brought to Hajin & later referred but he died: His brother pic.twitter.com/3vFYSspvCa
— ANI (@ANI) August 12, 2022
यामध्ये एक महिला शिक्षिका, राजस्थानमधील एक बँक व्यवस्थापक आणि बिहारमधील 3 मजुरांचा समावेश आहे.
टार्गेट किलिंगच्या अनेक घटना
जम्मू आणि काश्मीरमधील काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याबद्दल स्पष्ट करताना सांगितले की, मध्यरात्री, बांदीपोरातील सोडनारा संबलमध्ये दहशतवाद्यांनी मोहम्मद अमरेज या स्थलांतरित प्रवासी मजुराची गोळ्या झाडून हत्या केली आहे. अमरेज हा बिहारमधील मधेपुरा येथील बेसराहातील असून त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अमरेजला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्याचा तिथे मृत्यू झाला होता. या वर्षात केंद्रशासित प्रदेशात टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये बिगर मुस्लिम समाजातील लोकांचाही बळी गेला आहे.
मध्यरात्री गोळीबार : मृताचा भाऊ
दहशतवाद्यांकडून ठार करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मृताच्या भावाने सांगितले की, रात्री 12.20 वाजता माझ्या भावाने मला उठवून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी तो आमच्या आजूबाजूला नव्हता, त्यावेळी तो टॉयलेटला गेला असल्याचे वाटले, मात्र त्याचा शोध घेण्यासाठी ज्यावेळी आम्ही बाहेर गेलो तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर सुरक्षा दलाला या घटनेची माहिती दिली. भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसल्यानंतर आणि सुरक्षादलाला त्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी त्याला हाजीनला हलवण्यास सांगितले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
शुक्रवारच्या हल्ल्यात 4 जवान शहीद
दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या तळावर हल्ला केला होता, त्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले, दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
आत्मघातकी हल्लेखोऱ्यांकडून हल्ले
हा हल्ला तीन वर्षांच्या कालावधीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी हल्लेखोऱ्यांकडून हल्ले होत असल्याची चिन्हे आहे असं सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही दहशतवादी हे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनेबरोबर संबंधित आहेत. ज्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षादलाकडून हल्ले सुरू झाले त्यावेळी स्टील कोअर बुलेटचा वापर त्यांच्याकडून करण्यात आला होता, त्यामुळे ते दीर्घकाळ गोळीबाराला उत्तर देते होते मात्र चार तास भारतीय जवानांकडून दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मध्यरात्रीनंतर चाललेली चकमक सकाळी 6.30 च्या सुमारास संपली. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस आधी सोमवारी हा हल्ला झाला असल्याने सुरक्षा दलाकडून आता विशेष काळजी घेण्यात येत आहे.