Jammu and Kashmir : असं ठिकाण जिथे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिंरगा फडकला!
प्रेस एन्क्लेव्ह या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिलीय.
श्रीनगर : देशाल्या स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली. पण असं एक ठिकाण होतं जिथं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. जम्मू-काश्मीरमधील लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह हे ते ठिकाण आहे. या इमारतीवर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिलीय. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रेस एन्क्लेव्हवर डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याचे फोटोही शेअर केले आहेत. (The tricolor flag was hoisted on the Press Enclave building at Lal Chowk)
Tri-colour ?? hosted over Press Enclave at Lal Chowk #Srinagar, for the first time since independence. pic.twitter.com/N6STmu59wd
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) April 7, 2021
श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्यावरुन अनेकदा वाद झाल्याचं आपण ऐकलं आणि वाचलं असेल. ही परिस्थितीत अनेक वर्षे कायम होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचं पाहायला मिळतंय. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी होत असल्याचा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जातो. अशावेळी लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह इमारतीवर तिरंगा फडकल्यानं देशप्रेमी नागरिकांकडून आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे.
1992 मध्ये लाल चौकात फडकला होता तिरंगा
यापूर्वी सर्वात आधी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचं काम 1992 मध्ये भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलं होतं. मुरली मनोहर जोशी यांनी 1991 मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर अशी एकता यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप 26 जानेवारी 1992 म्हणजे प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकावून करण्यात आला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो वेगळा होऊ देणार नाही, असा संदेश एकता यात्रेतून देण्यात आला होता.
2016 मधील ‘भारत जोडो’ अभियान
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी विनायक पाटील आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी 2016 मध्ये गांधी जयंती दिनी श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता. त्यावेळी काही स्थानिक तरुणांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला न जुमानता तिंरगा डौलाने फडकवण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा ते श्रीनगर दरम्यान काढलेल्या भारत जोडो यात्रेचा समारोप 2 ऑक्टोबर 2016 रोजी लाल चौकात तिरंगा फडकावून करण्यात आला होता.
इतर बातम्या :
नक्षलवाद्यांकडून बेपत्ता जवान राकेश्वर सिंगचा फोटो प्रसिद्ध, सुटकेसाठी ठेवली ‘ही’ अट
The tricolor flag was hoisted on the Press Enclave building at Lal Chowk