जम्मू काश्मिर आज भुकंपाने हादरले; तीव्रता 5.1; भुकंपाचे केंद्र अफगानिस्तान-ताजिकिस्तान
या भुकंपाचे केंद्रस्थान अफगानिस्ता आणि ताजिकिस्तान असले तरी त्याचे धक्के हे जम्मू काश्मिरपर्यंत बसले आहेत.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu kashmir) आज भुकंपाचे धक्के (earthquake) बसले. या भुकंपाची तीव्रता 5.1 अशी नोंद करण्यात आली असून भुकंपाचे केंद्रस्थान हे अफगानिस्तान-ताजिकिस्तान (epicenter earthquake is Afghanistan-Tajikistan) हे दाखवण्यात आलेआहे. हा भूकंप आज दुपाली 1 वाजून 5 मिनिटांनी झाला आहे. या भुकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसून या घटनेची माहिती भूकंप विज्ञान केंद्रद्वारे ट्विट करुन सांगण्यात आले आहे. या भुकंपाचे केंद्रस्थान अफगानिस्ता आणि ताजिकिस्तान असले तरी त्याचे धक्के हे जम्मू काश्मिरपर्यंत बसले आहेत.
Earthquake of Magnitude:5.1, Occurred on 14-06-2022, 13:05:44 IST, Lat: 36.42 & Long: 71.23, Depth: 180 Km ,Location: 96km SE of Fayzabad, Afghanistan for more information Download the BhooKamp App https://t.co/GE3BjiXU8q @Indiametdept @ndmaindia pic.twitter.com/ZfxKjWiTSW
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 14, 2022
जम्मू काश्मिर आज भुकंपाच्या धक्क्याने हादरले, या भुकंपाची तीव्रता 5.1 अशी नोंदवली गेली असली तरी या भुकंपाचे केंद्रस्थान हे अफगानिस्तान-ताजिकिस्तान दाखवण्यात आले आहे.
कोणतेही नुकसान नाही
या भुकंपाच्या धक्क्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मिरमध्ये 1 वाजून 5 मिनिटांनी या भुकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.
केंद्र अफगानिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये
भूकंप विज्ञान केंद्राद्वारे कळवण्यात आले आहे की, जम्मू काश्मिरमध्ये आज जे भुकंपाचे धक्के जाणवले आहेत, त्याचे केंद्र हे अफगानिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आहे, मात्र त्या भुकंपाचे धक्के जम्मू काश्मिरमध्ये जाणवले आहेत. भूकंप विज्ञान केंद्राद्वारे सांगण्यात आले आहे की, मागील महिन्यात भुकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये हिमाचल प्रदेश (3.5 तीव्रता), अरुणाचल प्रदेश (4.2 तीव्रता) या ठिकाणी त्याचे धक्के जाणवले होते. भुकंपाच्या या धक्क्यामध्येही कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
…आणि भूकंप होतो
पृथ्वीमध्ये 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत राहतात, ज्या ठिकाणी या प्लेट्स अधिक आदळतात त्यांना फॉल्ट लाइन झोन असे म्हटले जाते. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्सचे कोपरे वळले जातात, त्याक्षणी त्या प्लेटवरचा दबाव वाढू लागतो आणि प्लेट्स तुटू लागतात.त्यांच्या बिघाडामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधू लागते. त्यानंतर भुकंपाचे धक्के बसू लागतात.
एवढी तीव्रता असेल तर धोका ठरलेला
पृथ्वीला अनेकदा भुकंपाचे धक्के बसत असतात, त्यामध्ये रिश्टर स्केलवर 7.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भुकंपाचा धक्का लागला तर मध्यम धोकादायक समजला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हटले जाते, आणि तो बहुदा जाणवतही नाही. 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के झालेच तर मात्र घरांचे नुकसान होते.