अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, यात्रा रोखली

हिंदूचं तीर्थस्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशवादी हल्लाचं सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे.

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, यात्रा रोखली
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 7:42 PM

श्रीनगर : हिंदूचं तीर्थस्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशवादी हल्लाचं सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे. तसेच, यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर तातडीने रिकामं करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सुरक्षा दलाला अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशनदरम्यान स्नायपर रायफल आढळून आल्या. त्यानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमरनाथला जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी (2 ऑगस्ट) सुरक्षा दलाला आयईडी, अँटी पर्सनल माईन आणि स्नायपर रायफल आढळल्या. दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याची योजना आखत आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाला काही दिवसांपूर्वी गुप्त संस्थेकडून मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि सीआरपीफच्या जवानांनी अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर लक्ष ठेऊन होते. यादरम्यान, जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं.

या सर्च ऑपरेशनमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाला यश प्राप्त झालं. सुरक्षा दलाने या परिसरातून मोठ्या प्रमाणात आयईडी आणि पाकिस्तानच्या ऑर्डिनंस फॅक्ट्रीमध्ये निर्मित अँटी पर्सनल माईन्स आढळल्या. त्यासोबतच एम-24 स्नायपर रायफलही यात्रेच्या मार्गात मिळाली. यावेळी मिळालेली आयईडी स्फोटकं इतक्या मोठ्या प्रमाणात होती की त्याने खूप नूकसान होऊ शकलं असतं.

“अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे काश्मीरची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, तसेच अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांची सुरक्षा पाहता काश्मीर खोऱ्यात तात्काळ सर्व प्रकारच्या यात्रा थांबवण्यात येत आहेत. अमरनाथ यात्रेकरुंनी तात्काळ त्यांची यात्रा थांबवावी आणि लवकरात लवकर घाटी सोडावी”, अशी सूचना जम्मू-काश्मीर सरकारच्या गृहखात्याने केली.

अमरनाथ यात्रा ही 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, राज्य सरकारच्या सूचनेनंतर ही यात्रा तात्काळ थांबवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षा कारणांमुळे पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरुंना तात्काळ काश्मीर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर सरकार स्थानिक लोकांसाठीही अशाप्रकारची खबरदारी घेण्यात येईल का? काश्मिरी लोकांनाही इतर ठिकाणी स्थलांतरित केलं जाईल? की त्यांच्या आयुष्याची काही किंमतच नाही, असा प्रश्न माजी आयएएस आणि जेके पीपल्स मुव्हमेंटचे नेते शाह फैसल यांनी उपस्थित केला आहे.

M-24 स्नायपर रायफल काय आहे?

  • स्नायपर रायफल ही आधुनिक आणि अत्यंत भेदक मानली जाते
  • मिलिट्री आणि आंतरराष्ट्रीय पोलिसांकडेच हे अद्याधुनिक शस्त्र आढळतं
  • सर्वात आधी अमेरिकन आर्मीच्या ताफ्यात ही आधुनिक रायफल होती
  • ही केवळ एक बंदूक नाही तर, त्यामध्ये आधुनिक दुर्बीण आणि अन्य उपकरणंही आहेत
  • ही रायफल एका मिनिटांत 20 राऊंड फायर करण्याची क्षमता ठेवते
  • ही 800 मीटर ते 1500 मीटर पर्यंतचं लक्ष भेदू शकते
  • ही रायफल 790 मीटर प्रति सेंकदाच्या वेगाने गोळ्या झाडू शकते

अँटी पर्सनल माईन्स 

  • घातपात करण्याच्या उद्देशाने अँटी पर्सनल माईन्सची निर्मिती केली जाते
  • जमिनीत पुरुन शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा हेतू असतो
  • माणसाचा पाय जरी पडला, तरी मोठा स्फोट होऊन, जखमी किंवा मृत्यू होतो
  • शत्रूंच्या वाहनांचं नुकसान करण्यासाठीही या माईन्सचा वापर केला जातो
  • अँटी पर्सनल माईन्स लहान आकाराचे असल्याने ते लक्षात येत नाहीत
  • लहान आकारामुळे ते जास्तीत जास्त ठिकाणी जमिनीत पुरुन ठेवता येतात
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर भूसुरुंगांवर बंदी घालण्यासाठी 1997 मध्ये ऑटवा करार करण्यात आला
  • अमेरिका, रशिया, इस्रायल, चीन, पाकिस्तान आणि भारताने अद्यापही हा करार मान्य केलेला नाही.

2017 मध्येही यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला 

2017 मध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 32 भाविक जखमी झाले होते. त्यावेळी हल्लेखोर हे मोटार सायकलने आले होते. पहिले त्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर यात्रेकरुंच्या बसवर निशाणा साधला होता.

पाहा व्हिडीओ :

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.