Jammu Kashmir : पाकमधून ड्रोननं भारतात हत्यारं पाठवली जातायत? जम्मू काश्मीरमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला
बंदुकीच्या गोळ्या, स्फोटकं सदृश्य वस्तू आणि इतक साम्रग्री पोलिसांनी शोधून काढली
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) घातपाचा मोठा कट उधण्यात आला. मंगळवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. मोठा कट रचला जात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी (Police) एक मोहीम राबवली. यादरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. एका मोठ्या अतिरेकी मॉड्यूलचा (Terrorist Module) भाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. त्या अनुशंगाने पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या दारुगोळ्याची तपासणी केली जाते आहे. या कारवाईनंतर आता यंत्रण अधिक सतर्क झाल्या असून बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.
10 मे रोजी गुप्तपणे जंगलात दारुगोळा आणण्यात आला होता. हा दारुगोळा जंगालात लपवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी एक विषेश ऑपरेशन करत हा दारुगोळा शोधून काढला. यासाठी एक स्पेशल टीमच तैनात करण्यात आलेली. जम्मू काश्मीरच्या संबर येथील जंगलात करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान, दारु गोळा जप्त करण्यात आलाय. एनएनआयनं याबाबतची माहिती दिली आहे.
During the intervening night, info was received through reliable sources regarding the presence of cache of ammunition and related material in Sumber area of Ramban dist. Acting swiftly on this, a special team was constituted: J&K Police pic.twitter.com/2B2XOvOfF4
— ANI (@ANI) May 11, 2022
घनदाट जंगलात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन
संबर इथं घनदाट जंगल आहे. या जंगलात रात्रीच्या वेळीस सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यावेळी बंदुकीच्या गोळ्या, स्फोटकं सदृश्य वस्तू आणि इतक साम्रग्री पोलिसांनी शोधून काढली. यामध्ये तब्बल 179 राऊंड गोळ्या, दोन मॅगजीन, एक वायरलेस सेट, एक दूर्बीण आणि दोन ग्रेनेड हस्तगत करण्यात आलेत. याशिवाय एक यूबीजीएल रॉडदेखील पोलिसांना आढळून आलाय.
2 अतिरेकी मारले
दरम्यान, मंगळवारी सुरक्षा रक्षक आणि जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत दोघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यात एका नागरिकासह एक जवान जखमी झाला. यानंतर शोध मोहीमही राबवण्यात आली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता बंदबस्तात वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानातून ड्रोन द्वारे हत्यारं आणि दारुगोळे आणण्याचा प्लान असल्याची शंका व्यक्त केली जाते आहे.