२० वर्षाचा युवक, मातापार्वती बनून नाचत होता, खाली पडला आणि उठलाच नाही…
जम्मू येथे नुकतेच पार्वती मातेचे रूप धारण करून नाचतांना एकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील उत्तरप्रदेश येथील बरेली येथे वाढदिवसाच्या पार्टीत नाचतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच मैनपुरी येथे हनुमानाचे रूप धारण करून नाचतांना एकाचा मृत्यू झाला होता. देवी-देवतांचे रूप धारण करून नृत्य करतांना मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जम्मू : अलीकडच्या काळात नाचतांना मृत्यू होण्याच्या संख्येत विलक्षण वाढ होत आहे. अशाच घटना वारंवार घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जम्मू (Jammu) येथे नुकतेच पार्वती मातेचे रूप धारण करून नाचतांना एकाचा मृत्यू (Death) झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील उत्तरप्रदेश येथील बरेली येथे वाढदिवसाच्या पार्टीत (Birthdayparty) नाचतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच मैनपुरी येथे हनुमानाचे रूप धारण करून नाचतांना एकाचा मृत्यू झाला होता. देवी-देवतांचे रूप धारण करून नृत्य करतांना मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जम्मू येथील बिश्नेह तालुक्यात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी योगेश गुप्ता नामक व्यक्ति पार्वतीचे रूप धारण करून नृत्य सादर करत होते.
याचवेळी नृत्य करत असतांना प्रेक्षकांकडूनही प्रतिसाद मिळत होता. योगेश यावेळी मोठ्या उत्साहाने सादरीकरण करत होते. मात्र, नृत्य सादर करत असतांना ते व्यासपीठावर कोसळले. प्रेक्षकांसह सगळीकडे पळापळ झाली.
त्यांना चक्कर आली असावी म्हणून रुग्णालायकडे हलविण्यात आले. मात्र त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झालाच निष्कर्ष काढण्यात आला.
योगेश गुप्ता यांचा नृत्य सादर करतांना मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली. नृत्यसादर करतांना मृत्यू होण्याच्या घटना घडत असल्याने, विशेषतः देवी-देवतांचे रूप धारण केलेल्या नृत्य करतांना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जम्मू येथील घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.