झारखंड विधानसभेचे आज विशेष अधिवेशन होणार; सोरेन सरकार आजच विश्वासदर्शक ठराव मांडणार; भाजपचीही रणनिती ठरली

झारखंड विधानसभेच्या आज विशेष अधिवेशनात हेमंत सोरेन सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी छत्तीसगडमधील रायपुरमधून झारखंडला घेऊन आलेल्या सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांना रांचीमधील सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व आमदारांबरोबर काल रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आमदारांबरोबर आजच्या विश्वास ठरावाबाबत चर्चाही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

झारखंड विधानसभेचे आज विशेष अधिवेशन होणार; सोरेन सरकार आजच विश्वासदर्शक ठराव मांडणार; भाजपचीही रणनिती ठरली
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 7:06 AM

रांचीः महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे या राज्यातील राजकीय घडामोडींवर साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांनी सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावणार असून सोरेन सरकार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव (Motion of confidence in the assembly) मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच काल सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांची झारखंडमध्ये बैठक घेण्यात आली, त्या बैठकीनंतरच आजच्या विश्वास ठरावविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारला 49 आमदारांचा पाठिंबा असून 81 सदस्य असलेल्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडे सध्या 30 आमदार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे 18 आणि आरजेडीकडे एक आहे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे 26 आमदार आहेत.

या घटना घडामोडी घडत असतानाच हेमंत सोरेन यांनी आमदारकी सोडल्यानंतर मात्र विरोधकांकडून सोरेन सरकार पाडण्यासाठीच्या हालचालींनी जोर धरला आहे.

सोरेन सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार

झारखंड विधानसभेच्या आज विशेष अधिवेशनात हेमंत सोरेन सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी छत्तीसगडमधील रायपुरमधून झारखंडला घेऊन आलेल्या सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांना रांचीमधील सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व आमदारांबरोबर काल रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आमदारांबरोबर आजच्या विश्वास ठरावाबाबत चर्चाही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपची रणनीती तयार

हेमंत सोरेन सरकारकडून आज विश्वासदर्शक ठरावासाठी प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे मात्र भाजपकडूनही रविवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी आमदारांच्या या बैठकीत अनेक सूचना देण्यात आल्याचेही सागंण्यात आले आहे. या बैठकीत भाजपच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.