मुंबई : झारखंडचे मजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्यासंबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर चंपाई सोरेन यांची आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली होती. शुक्रवारी राजभवनामध्ये चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारचा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडला. यामध्ये चंपाई सोरेन यांना एकूण 47 मते तर विरोधकांना एकूण 29 मते पडली आहेत.
आमदारांचा घोडेबाजार रोखण्यासाठी जेएमएम आणि युतीमधील सर्व आमदारांना हैदराबादला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी रांचीमधील सर्किट हाऊसमध्ये त्यांना आणण्यात आलेलं. विश्वासदर्शक ठराव जिंकत झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी चंपाई सोरेन असणार आहेत. पीएमएलए कोर्टाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये भाग घेण्याची परवानगी दिली होती.
#WATCH | Former Jharkhand CM and JMM leader Hemant Soren says, “Today I have been arrested on charges of 8.5 acre land scam. If they have the courage, then show the documents of the land registered in my name. If it is proved, I will quit politics…” pic.twitter.com/q1WfVJ8P05
— ANI (@ANI) February 5, 2024
भाजपला माझं आव्हान आहे की, माझ्यावर केले गेलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत. जर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल, फक्त राजकारण नाहीतर मी झारखंड सोडून देईल. केंद्राच्या कारस्थानानंतर माझ्या अटकेत राजभवनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे.
दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नवीन नेत्याची निवड करण्यात आली. 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.